Success Story : फळ विकणाऱ्याच्या पोरानं उभं केलंय नॅचरल्स आइस्क्रीम!

WhatsApp Group

Naturals Ice Cream Success Story : आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या मेहनतीने 400 कोटी रुपयांची कंपनी बनवली आहे. ही यशोगाथा आहे नॅचरल्स आइस्क्रीम ब्रँडची. रघुनंदन श्रीनिवास कामत (Raghunandan Srinivas Kamath) यांनी 1984 मध्ये मुंबईत याची सुरुवात केली. कामत यांनी नॅचरल्स आइस्क्रीम प्रत्येक घरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इतके यश कसे मिळवले आणि त्याची कंपनी एवढी कशी वाढवली हे जाणून घ्या.

रघुनंदन श्रीनिवास कामत यांच्या वडिलांनी कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यात आंब्याचा स्टॉल लावला होता. योग्य फळ निवडून ते कसे जतन करावे हे रघुनंदन यांनी आपल्या वडिलांकडून शिकून घेतले. अनेक वर्षे वडिलांकडे राहून तेही फळे उचलायला शिकले आणि मग व्यवसाय करण्याच्या बेतात मुंबईला आले. 1984 मध्ये, 14 फेब्रुवारी रोजी, रघुनंदन यांनी मुंबईतील जुहू येथे नॅचरल्स नावाचे त्यांचे पहिले आइस्क्रीम स्टोअर उघडले. त्यावेळी त्यांची कंपनी फक्त चार लोक आणि दहा फ्लेवर्सचे आइस्क्रीम घेऊन चालत होती.

आइस्क्रीमसोबत पावभाजी…(Naturals Ice Cream Success Story)

रघुनंदन यांच्या जुहूच्या आइस्क्रीम पार्लरमध्ये पूर्वी फार कमी लोक यायचे. ग्राहकांची कमतरता होती. त्यामुळे त्यांनी यावर उपाय शोधला. रघुनंदन आइस्क्रीम आणि मसालेदार पावभाजी बनवू लागले. आता पावभाजी खाऊन लोक कामत यांचे गोड आणि थंड आइस्क्रीम खात. ते फक्त साखर, दूध आणि फळे वापरून आइस्क्रीम बनवत असे. त्यामुळे लोकांचा हळूहळू त्यांच्यावर विश्वास बसू लागला. रघुनंदन यांच्या पार्लरमध्ये अधिकाधिक लोक येऊ लागले.

हेही वाचा – Asian Games 2023 : भारताला तिसरे सुवर्ण! तब्बल 41 वर्षांनंतर केला पराक्रम

छोट्या दुकानाचा मोठा परिणाम (Naturals Ice Cream Success Story)

पहिल्या वर्षी, कामत यांनी जुहूच्या कोळीवाडा भागात 200 चौरस फुटांच्या छोट्या दुकानातून 5,00,000 रुपये कमावले. एक वर्षानंतर, त्यांनी आइस्क्रीमचा पूर्ण ब्रँड तयार करण्यासाठी पावभाजी बंद केली. आता कामत यांच्या सहा टेबल्सच्या रेस्टॉरंटमध्ये फ्रोझन आइस्क्रीमचे पाच फ्लेवर्स होते. त्यात कस्टर्ड ऍपल, काजू मनुका, चॉकलेट, आंबा आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड आईस्क्रीम होते.

आज करोडोंचा व्यवसाय (Naturals Ice Cream Success Story)

आज नॅचरल्स आइस्क्रीम देशभरात 135 पेक्षा जास्त स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. जॅकफ्रूट, टेंडर कोकोनट, ब्लॅख जामुन यासह 20 फ्लेवर्सचे आइस्क्रीम आउटलेटवर उपलब्ध आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅचरल्स आईस्क्रीमची उलाढाल 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जवळपास चार दशकांपासून रघुनंदन कामत यांनी आपल्या आइस्क्रीमची खासियत कायम ठेवली आहे की त्यात कोणतेही रंग किंवा रसायन मिसळले जात नाही. कामत यांचे आईस्क्रीम पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment