Maruti Swift : फक्त ३ लाखात मारूती स्विफ्ट..! चुकवू नका नवीन वर्षातील बेस्ट ऑफर

WhatsApp Group

Maruti Swift : मारुती स्विफ्ट ही लोकप्रिय हॅचबॅक कार आहे आणि तिची विक्री चांगली होते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील मारुती स्विफ्ट (Maruti Swift) कार घेण्याचा विचार करत असाल परंतु कमी बजेटमुळे अडकले असाल तर तुम्ही जुनी मारुती स्विफ्ट कार घेण्याचा विचार करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू या वेबसाइटवर आम्हाला अनेक मारुती स्विफ्ट कार आढळून आल्या आहेत, ज्या कमीत कमी ३.४ लाखांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि जर नीट बोलणी केली तर, ३ लाख रुपयांमध्ये देखील डील होऊ शकते.

वेबसाइटवर मारुती स्विफ्ट VDI ची किंमत रु.३,१०,००० म्हणून सूचीबद्ध आहे. कार ११०५१४ किमी धावली आहे आणि ती थर्ड ओनर आहे. २०१५ मॉडेलच्या या कारमध्ये डिझेल इंजिन आहे. ही गाडी धनबादमध्ये नोंदणीकृत आहे आणि फक्त तेथेच विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हेही वाचा – Mahindra XUV700 : महिंद्राच्या ग्राहकांसाठी खुशखबर..! नवीन XUV700 गाडीची किंमत ठेवलीय ‘इतकी’

आणखी एक मारुती स्विफ्ट VDI वेबसाइटवर रु. ३,२५,००० मध्ये सूचीबद्ध आहे. कार ७०७६६ किमी धावली आहे आणि सेकेंड ओनर आहे. २०१५ मॉडेलच्या या कारमध्ये डिझेल इंजिनही आहे. ही गाडी मल्लापुरम, धनबाद येथे नोंदणीकृत आहे आणि फक्त तेथेच विक्रीसाठी उपलब्ध आहे.

येथे सूचीबद्ध केलेली आणखी एक मारुती स्विफ्ट LXI ची किंमत रु.३३५००० आहे. कार फक्त ४७२१२ किमी धावली आहे आणि सेकेंड ओनर आहे. ही देखील २०१५ मॉडेलची कार आहे परंतु पेट्रोल इंजिनसह. ही गाडी नाशिक येथे नोंदणीकृत आहे आणि तेथेच विक्रीसाठी उपलब्ध आहे.

येथे सूचीबद्ध केलेली आणखी एक मारुती स्विफ्ट VDI ची किंमत रु. ३१५००० आहे. कार ११२६९४ किमी धावली आहे आणि ती फर्स्ट ओनर आहे. २०१४ मॉडेलच्या कारमध्ये डिझेल इंजिन आहे. ही गाडी गुरुग्राममध्ये नोंदणीकृत आहे आणि तेथे विक्रीसाठी देखील उपलब्ध आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment