

Nissan Magnite Discount Offer : तुम्ही परवडणारी SUV शोधत असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. कार निर्माता कंपनी Nissan आपल्या Magnite SUV वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ही आधीच देशातील सर्वात स्वस्त एसयूव्हीपैकी एक आहे. त्याची किंमत फक्त 6 लाख रुपयांपासून सुरू होते. या महिन्यात कंपनी Nissan Magnite वर 90,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
Nissan Magnite वर 90 हजारांची सूट
कंपनी 2022 मध्ये निर्मित निसान मॅग्नाइटवर जास्तीत जास्त 90,000 सूट देत आहे. यामध्ये रु. 12,000 प्री मेंटेनन्स पॅकेज, रु. 20,000 एक्सचेंज बोनस, रु. 20,000 ऍक्सेसरीज, रु. 15,000 कॉर्पोरेट सूट, रु 10,000 लॉयल्टी बोनस, रु 2,000 ऑनलाइन बुकिंग बोनस यांचा समावेश आहे.
हेही वाचा – वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांसाठी खुशखबर! मंत्री गिरीष महाजनांची मोठी घोषणा; म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात…”
याशिवाय, कंपनी 2023 उत्पादनासह BS6 फेज 1 मॉडेलवर 71 हजारांची सूट देत आहे. या सवलतीमध्ये 6,950 रुपयांचे प्री मेंटेनन्स पॅकेज, 20,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस, 12,000 रुपयांचे अॅक्सेसरीज, 10,000 रुपयांचे कॉर्पोरेट डिस्काउंट, 10,000 रुपयांचे लॉयल्टी बोनस, 2,000 रुपयांचे ऑनलाइन बुकिंग बोनस यांचा समावेश आहे.
किंमत आणि फीचर्स
Nissan Magnite ची किंमत 6 लाख ते 10.94 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. हे पाच ट्रिममध्ये विकले जाते: XE, XL, XV एक्झिक्युटिव्ह, XV आणि XV प्रीमियम. निसानच्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलाइट्स, वायरलेस फोन चार्जर, एअर प्युरिफायर, अॅम्बियंट लाइटिंग आणि पुडल लॅम्प यांसारखी फीचर्स आहेत.
सुरक्षिततेसाठी, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, हिल-स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!