

Odisha : ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने त्याच्या ७० वर्षीय वडिलांची केवळ १० रुपये न दिल्याने निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचे वडील बैधर सिंग यांची धारदार शस्त्राने हत्या केली आणि नंतर कापलेले डोके घेऊन थेट पोलीस ठाण्यात गेला आणि आत्मसमर्पण केले.
बारीपाडा एसडीपीओ प्रवीण मलिक म्हणाले की, हत्येचे कारण खूपच क्षुल्लक होते. आरोपीने त्याच्या वडिलांकडे गुटखा खरेदी करण्यासाठी १० रुपये मागितले होते, परंतु वडिलांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मुलाला त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या केली.
घटनेच्या वेळी आरोपीची आईही तिथे उपस्थित होती, पण पतीची हत्या होताना पाहून ती घाबरली आणि घटनास्थळावरून पळून गेली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक टीमसह तपास सुरू केला. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेबद्दल ऐकल्यानंतर सर्वजण स्तब्ध झाले आहेत. फक्त दहा रुपयांसाठी मुलगा आपल्या वडिलांना कसे मारू शकतो, हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेनंतर लोक वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!