

PAN 2.0 Benefits : केंद्रातील मोदी सरकारने सोमवारी म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी पॅन 2.0 लाँच करण्याची घोषणा केली. आतापर्यंत पॅन कार्डमध्ये QR कोड नव्हता. नवीन पॅन 2.0 QR कोडने सुसज्ज असेल. यासाठी सरकार 1432 कोटी रुपये खर्च करणार आहे. पॅन 2.0 ची घोषणा झाल्यापासून लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
पॅन हा आयकर विभागाने जारी केलेला 10 अंकी क्रमांक आहे. यामध्ये अंकांसोबत इंग्रजी अक्षरांचाही समावेश करण्यात आला आहे. हा क्रमांक केवळ भारतीय करदात्यांना जारी केला जातो.
केंद्र सरकारने पॅन 2.0 अंतर्गत QR कोड आधारित प्रणाली लागू केली आहे. पॅन जारी करण्याच्या विद्यमान प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले, जुन्या पॅनकार्डमध्ये सुरक्षा त्रुटी होत्या. त्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढत होत्या. एका व्यक्तीच्या पॅनकार्डवरून त्याची ओळखही चोरीला जात होती. याशिवाय जुने कार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअरही 15 ते 20 वर्षे जुने आहे. त्यामुळे अनेकवेळा त्रास होतो.
नाही, नवीन प्रणाली लागू झाल्यानंतरही विद्यमान पॅन कार्ड वैध राहतील. जोपर्यंत नवीन कार्ड तयार होत नाही, तोपर्यंत ही कार्डे कार्यरत राहतील. पॅन 2.0 तयार झाल्यानंतर नवीन कार्ड वापरणे अनिवार्य होईल.
हेही वाचा – 1 डिसेंबरपासून OTP साठी वाट पाहावी लागणार! नवा नियम होणार लागू
नाही, जर तुम्ही जुने कार्ड अपडेट करत असाल तर पॅन नंबर तसाच राहील. पण पहिल्यांदा पॅन कार्ड बनवल्यावर तुम्हाला पॅन 2.0 सोबत नवीन पॅन नंबर मिळेल.
नाही, ज्यांच्याकडे आधीच पॅनकार्ड आहे त्यांना नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही. होय, कार्डशी संबंधित माहितीमध्ये काही बदल झाल्यास तुम्हाला पॅन 2.0 कार्डसाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हे काम करु शकता.
हे आणण्याचा उद्देश हा आहे की बनावट कार्ड ओळखणे सोपे होईल आणि आयकरदात्यांना एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येणार नाही. नवीन प्रणाली अंतर्गत जारी केलेले पॅन कार्ड QR कोडने सुसज्ज असतील. याद्वारे कार्डवर नोंदवलेल्या तपशीलांची पडताळणी डिजिटल माध्यमातून करता येणार आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!