Satyanarayan Katha In English : पुराणात असं म्हटलं आहे की सत्यनारायण हे भगवान विष्णूचं एक रूप आहे. सत्यनारायणाची पूजा केल्यानं भगवान विष्णू भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव करतात, अशी श्रद्धा आहे. जीवनात सुख-शांती येते, असंही म्हटलं जातं, पण सत्यनारायणाची पूजा असताना त्याची कथा इंग्रजी भाषेत सांगितल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? संध्या इंटरनेट जगतात एकापेक्षा एक व्हिडिओ येत असतात. यापैकी काही व्हिडिओ इतके आश्चर्यकारक आहेत की त्यांना पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येतं. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे, तसेच लाखो लोकांनी आपापल्या शैलीत त्यावर कमेंट केल्या आहेत.
इंग्रजी भाषेत सत्यनारायणाची कथा
तुम्ही आजपर्यंत संस्कृत आणि हिंदीमध्ये सत्यनारायण कथा ऐकली असेल, परंतु या व्हिडिओमध्ये एक भटजी इंग्रजी भाषेत सत्यनारायणाची कथा सांगताना दिसत आहे. इतकंच नाही, तर भटजींच्या आजूबाजूचे काही लोक त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत आहेत. व्हिडिओ पाहून तो दक्षिण भारतातील घराचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा – बाटलीत पेट्रोल देत नाही, ऐकल्यावर माणसानं केला ‘असा’ जुगाड..! पंपावर जमली गर्दी; VIDEO व्हायरल!
Satyanarayan katha in English, for new generation understanding pic.twitter.com/ptsiVQX5dg
— KulwantSingh ਲੰਬੜਦਾਰ 🇮🇳 (@KulwantJanjue) August 10, 2022
काय आहे व्हिडिओत?
भटजी सत्यनारायणाची कथा इंग्रजीत कशी सांगत आहेत आणि कुटुंबातील पुरुष, स्त्रिया आणि मुले त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकत आहेत हे तुम्ही व्हिडिओमधून पाहू शकता. येथे स्त्रीचा पेहराव, व्हिडिओमध्ये दिसणारे पूजेचं साहित्य आणि ते मांडण्याची पद्धत दक्षिण भारतीय संस्कृतीप्रमाणे दिसते. वास्तविक, दक्षिण भारतातील अनेक भागात इंग्रजी बोलली जाते. हेच कारण असावे की तिथं सत्यनारायणाची ही कथा इंग्रजीतही सांगितली गेली. यादरम्यान पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही त्यावर आपापल्या शैलीत प्रतिक्रिया देत आहेत. हे पाहिल्यानंतर कोणी भारताच्या प्रगतीबद्दल बोलत आहेत, तर कोणी नवीन विचार आणि नवीन शैलीबद्दल मत व्यक्त करत आहे.
सत्यनारायण व्रत कथा
एकदा नारद ऋषींनी भगवान विष्णूला विचारलं, की हे भगवान, या मृत्यूच्या जगात प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. असा कोणताही मार्ग नाही का ज्याद्वारे या मानवांचे सर्व दु:ख दूर होईल. भगवान नारायणांनी नारदांना सांगितलं, की वत्स हे असं व्रत आहे, जे केवळ मृत्यूच्या जगातच नाही तर स्वर्गातही आहे, ज्याद्वारे सर्व प्रकारची संकटं दूर होतात. सत्यनारायणाचं व्रत विधिपूर्वक पाळल्यानं सुख मिळते व मोक्ष प्राप्त होतो. जो सत्याला भगवंत मानतो आणि व्रताच्या रूपात त्याचं पालन करतो, तो सर्व सांसारिक सुखांचा अनुभव घेतो, असं म्हटलं जातं.