

मुंबई : प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते, की आपल्या मुलानं योग्य मार्गावर असावं (Parenting Tips) आणि आयुष्यात कधीही चुकीचं काम करू नये. पण अनेक वेळा जाणून बुजून किंवा नकळत पालक अशा अनेक गोष्टी मुलांना सांगतात, ज्याचा त्यांच्या हृदयावर आणि मनावर खूप वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत मुलाशी बोलताना तुम्ही काय बोलत आहात आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे लक्षात ठेवावे.
मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांच्यात नवं काहीतरी शिकण्याची इच्छा असते. काहीवेळा मुलं गोष्टींचा वेगळा अर्थ काढतात. अशा परिस्थितीत मुलांशी काहीही बोलताना पालकांनी त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ मुलांकडून लावणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. तुमच्या मुलानं योग्य मार्गावर चालावं असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाला काही गोष्टी चुकूनही सांगू नका. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना कधीही सांगू नये.
जबाबदाऱ्यांची भीती
पैशाचं संकट, घरातील आजारपणं याविषयीचं बोलणं मुलांसमोर कधीच करून नका. जेव्हा पालक पैशाबद्दल टेन्शन घेतात आणि मुलांसमोर त्याबद्दल बोलतात तेव्हा ते त्यांची भीती मुलांमध्ये स्थानांतरित करतात. अनेक वेळा असं केल्यानं मुलांवर ओझं पडतं कारण मुलंही त्याबद्दल खूप टेन्शन घेऊ लागतात, जे त्यांना हाताळण्यासारखे नसतं.
मुलांसमोर इतरांचा तिरस्कार करू नका!
अनेक वेळा लोक रागावतात आणि मुलांसोबत इतरांना वाईट बोलू लागतात. अनेक वेळा लोक आपल्या जोडीदारावर किंवा मुलांसोबतच्या कुटुंबातील सदस्यावर टीका करताना हे विसरतात की मूल जितका तुमच्यासोबत राहतो तितकाच तो इतर लोकांसोबतही वेळ घालवतो. अशा परिस्थितीत, तुमच्या बोलण्यामुळं, त्याला स्वतःला दोन वेगवेगळ्या भागात विभागल्यासारखं वाटू लागतं. बर्याच वेळा यामुळं मुलें अशा लोकांचा तिरस्कार करतात ज्यांच्याबद्दल तुम्ही वाईट बोलता.
‘..तू कधीच जन्माला आला नसतास’
तुम्ही कितीही रागावला असाल, पण मुलाला ‘तू जन्मलाच नसतास’, असं म्हणू नका. कोणत्याही मुलाला त्यांच्या पालकांकडून हे ऐकायचे नसतं. या गोष्टींमुळं तुमच्या मुलाच्या भावना तर दुखावतातच पण त्याचा स्वाभिमानही दुखावतो. हे मुलाच्या मनात येऊ शकतं की त्याला कोणीही पसंत करत नाही.
‘अशा’ कमेंट्स करणं टाळा
मुलं रडत नाहीत किंवा मुलींनी शांत बसावं, अशा कमेंट्सचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्ही मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यापासून थांबवता तेव्हा ते शांत राहायला शिकतात आणि त्यांच्या मनात काय आहे ते ऐकणं थांबवतात.