

Perfume Made From Sweat : तुम्ही बर्याचदा डिओडोरंट्सच्या जाहिराती पाहिल्या असतील, ज्यात मुले एकदा त्यांचा वापर करतात तेव्हा मुली त्यांच्याकडे आकर्षित होतात हे दाखवले जाते. डिओडोरंट्स आणि परफ्यूम विकण्यासाठी कंपन्या ही आयडिया निवडतात. पण लोकांना आकर्षित करण्याच्या त्याच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे तुम्हा सर्वांना माहीत असेलच. पण ब्राझीलच्या एका मॉडेलने नवीन स्वेट परफ्यूम ब्रँड लाँच केला आहे आणि तो लॉन्च होताच मागणी झपाट्याने वाढली आहे कारण लोकांचा असा दावा आहे की परफ्यूमच्या वासाने इतरांना आकर्षित करणे खूप सोपे झाले आहे. या परफ्यूमची विचित्र गोष्ट म्हणजे त्यात त्या मॉडेलच्या घामाचाही समावेश आहे.
हो तुम्ही बरोबर वाचले आहे! ब्राझीलच्या एका तरुणीने घामाने बनवलेले परफ्यूम बाजारात आणले आहे. ऑडिटी सेंटर न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, साओ पाउलोमध्ये राहणारी 29 वर्षीय मॉडेल व्हेनेसा मौरा हिने एक परफ्यूम ब्रँड लॉन्च केला आहे. मॉडेल असण्यासोबतच ती ऑनलाइन एन्फ्लूएन्सर देखील आहे. तिचा घाम तिच्या परफ्युममध्ये मिसळला आहे. पण अशी विचित्र कल्पना तिला कशी सुचली?
हेही वाचा – ग्राहकांची चांदी..! Axis Bank ने वाढवले FD वरील व्याजदर; चेक करा नवे रेट!
खरं तर, तिचा बॉयफ्रेंड आणि एक्स-बॉयफ्रेंड यांनी तिला अनेकदा सांगितले होते, की तिच्या शरीराचा नैसर्गिक वास सुगंधी आहे जो लोकांना तिच्याकडे आकर्षित करतो आणि तिला उत्तेजित करतो. व्हेनेसाने ही गोष्ट इतकी गांभीर्याने घेतली की तिने घामापासून परफ्यूम बनवला. ‘फ्रेश गॉडेस’ (Fresh Goddess perfume) नावाच्या या परफ्यूममध्ये घामाशिवाय इतरही अनेक पदार्थ आहेत. प्रत्येक बाटलीमध्ये 8 मिली पर्यंत घाम असतो. तिचा दावा आहे की अनेक ऑनलाइन फॉलोअर्सने सांगितले की तिच्या परफ्यूममुळे ती तिच्या जोडीदाराला खूप आकर्षित करते. एकाने तर सांगितले की परफ्यूममुळे तिच्या क्रशने तिला दुसऱ्यांदा डेटसाठी बोलावले होते.
परफ्यूमची किंमत
आता या परफ्यूमची किंमत किती आहे ते जाणून घेऊया. ज्यांना घामाचा परफ्यूम घ्यायचा आहे, त्यांना आपला खिसा खूप मोकळा करावा लागेल. त्याची किंमत इतकी जास्त आहे की तुमचे होश उडून जातील. अहवालानुसार, 50 मिलीच्या फक्त एका बाटलीची किंमत 138 डॉलर्स म्हणजेच 11 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. व्हेनेसा म्हणाली की तिचा नैसर्गिक सुगंध पुरुषांना खूप आकर्षित करतो, त्यामुळे महिलांसाठीही ते प्रभावी ठरेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!