Petrol Diesel Price Today : आज २८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी मंगळवार, २८ फेब्रुवारी २०२३ साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. अशाप्रकारे आज सलग २८० वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
देशातील महानगरांमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा हा दर आहे
सध्या दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.6६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
हेही वाचा – जास्त दिवस जगायचंय? मग ‘या’ सुपरफूड्सचा आहारात करा समावेश
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी ६ वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP ९२२४९९२२४९ वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक ९२२३११२२२२ वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price ९२२२२०११२२ वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!