PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या कामाची बातमी..! सरकारकडून खात्यात येणार १५ लाख; ‘असा’ करा अर्ज!

WhatsApp Group

PM Kisan FPO Yojana 2023 : तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पीएम किसानच्या 14व्या हप्त्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. मात्र ते कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या क्रमाने शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपये दिले जात आहेत. या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळेल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मोदी सरकारने ‘पीएम किसान एफपीओ योजना’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपये दिले जातील. देशभरातील शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची साधने किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होणार आहे.

हेही वाचा – Snoring : तुम्ही झोपेत खूप घोरता? का असं होतं? त्यापासून मुक्त कसं व्हायचं? जाणून घ्या!

याप्रमाणे करावा लागेल अर्ज

  • सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • होम पेजवर दिलेल्या FPO च्या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे ‘Registration’ या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर फॉर्म उघडला असता.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
  • यानंतर, पासबुक किंवा रद्द केलेला चेक किंवा आयडी स्कॅन करून अपलोड करा.
  • शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा.

लॉगिन कसे करायचे?

  • राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • यानंतर, तुम्ही होम पेजवर दिलेल्या FPO पर्यायावर क्लिक करा.
  • आता login च्या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.
  • त्यात युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
  • यासह तुम्ही लॉगिन कराल.
Leave a comment