जज साहेब, माझी सुटका करा..! राज कुंद्रानं दाखल केलीय याचिका

WhatsApp Group

Raj Kundra files discharge plea : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यानं मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यानं अ‍ॅप्सद्वारे कथित अश्लील चित्रपट बनवणं आणि त्याचं वितरण केल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणी राजला जुलै २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. तो आता जामिनावर बाहेर आहे. त्याचे वकील प्रशांत पाटील यांनी २० जुलै रोजी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता, त्याचा रिपोर्ट बुधवारी समोर आला.

राज कुंद्रानं कथित गुन्ह्यातून आर्थिक किंवा अन्य प्रकारचा नफा कमावल्याचं कोणतेही पुरावे पोलिसांना सापडलेले नाहीत, असं याचिकेत म्हटलं आहे. याशिवाय, फिर्यादीनं त्याच्यावर गुन्हेगारी हेतूचा कोणताही आरोप लावलेला नाही. न्यायालयानं फिर्यादी पक्षाला ८ सप्टेंबर रोजी उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे.

हेही वाचा – नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘आपल्यासारख्या’ लूकवर अर्चना म्हणते, “माझी तुलना…”

एका महिलेनं अनेक गंभीर आरोप केल्यानंतर आणि तक्रार दाखल केल्यानंतर राज कुंद्रा आणि इतरांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. नंतर हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं. राज यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ४२०, २९२ आणि २९३ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा, १९८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज कुंद्राच्या मुंबईतील कार्यालय आणि जुहूच्या बंगल्यावरही पोलीस अधिकाऱ्यांनी छापे टाकले. राजला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जामीन मंजूर झाला होता. त्याच्या सुटकेच्या काही महिन्यांनंतर, राज कुंद्रानं म्हटलं होतं, की संपूर्ण भाग हा त्याच्या विरुद्ध ‘विच हंट’ होता, ज्या अंतर्गत त्याला गोवण्यात आले होते.

‘पोर्नोग्राफी बनवण्यात कधीच गुंतलो नाही’

राज कुंद्रा म्हणाला, “खूप विचार केल्यावर माझ्या विरोधात अनेक दिशाभूल करणारे आणि बेजबाबदार लेख लिहिले गेले आहेत. माझ्या शांतपणाला चुकीचं समजलं गेलं. मी माझ्या आयुष्यात ‘पोर्नोग्राफी’ बनवण्याच्या आणि वितरणात कधीच सहभागी नव्हतो. हे संपूर्ण प्रकरण दुसरे तिसरे काही नसून विच हंट आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे मी स्पष्टीकरण देऊ शकत नाही, परंतु मी खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, जिथे सत्याचा विजय होईल.” राज कुंद्रा सार्वजनिक ठिकाणी चेहरा लपवताना दिसून येतो.

राज कुंद्राचा जन्म १९७५ मध्ये लंडन, यूके येथे झाला, परंतु त्याचे पूर्वज पंजाबचे आहेत. त्याचे वडील बाल कृष्ण कुंद्रा प्रथम लुधियानामध्ये राहत होते. राजचे वडील लुधियानामध्ये कंडक्टर म्हणून काम करत होते आणि नंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राज कुंद्रानंही व्यवसाय सुरू केला आणि लवकरच भारतासह ब्रिटन आणि दुबईमध्ये वाढवला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment