Gas Cylinder : ऐतिहासिक घोषणा..! ‘या’ तारखेपासून फक्त ५०० रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर

WhatsApp Group

Gas Cylinder : महागाईने होरपळलेल्या राजस्थानातील जनतेला मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राजस्थानमध्ये १ एप्रिलपासून एलपीजी सिलिंडरची किंमत ५०० रुपयांनी कमी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. एप्रिलमध्ये, गेहलोत सरकार दारिद्र्यरेषेखालील लोकांना आणि उज्ज्वला योजनेत नोंदणी केलेल्या लोकांना ५०० रुपयांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर प्रदान करेल.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाहीर केले आहे की, आता गरीब कुटुंबांना स्वस्त दरात सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील. दारिद्र्य रेषेखालील (BPL) आणि गरीब लोकांना याचा लाभ मिळू शकणार आहे. यामुळे बीपीएल आणि गरीब लोकांना राजस्थानमध्ये स्वस्त दरात गॅस सिलिंडर खरेदी करता येणार आहे. त्याचवेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सिलिंडरच्या किंमतीचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : क्रूड किमतीत चढ-उतार सुरूच, काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर?

एलपीजी किंमत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाहीर केले की, गरिबांना अधिक दिलासा देण्यासाठी राजस्थान सरकारकडून सातत्याने लोककल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत. याच अनुषंगाने राज्य सरकार गरिबांना स्वस्त दरात सिलिंडर देण्यासाठी योजना आणत आहे. या महागाईच्या युगात सामान्य माणसांवरील आर्थिक भार कमी करणे हे राजस्थान सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत.

अशोक गेहलोत यांनी सांगितले की, ही योजना १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. ज्यातून एक सिलेंडर ५०० रुपयांना मिळेल. तथापि, उज्ज्वला योजनेशी संबंधित केवळ बीपीएल आणि गरीब लोकच ५०० रुपयांना सिलिंडर घेऊ शकतील. त्याचबरोबर त्यांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळू शकतील. अशा परिस्थितीत गरीबांना एका वर्षात ५०० रुपये दराने १२ सिलिंडरसाठी ६००० रुपये मोजावे लागणार आहेत. जी सामान्य किंमतीपेक्षा खूपच कमी आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment