

मुंबई : रिझर्व्ह बँकेनं (RBI) रेपो रेटमध्ये सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे (RBI Monetary Policy) निकाल जाहीर केले आणि सांगितलं की रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर नवीन रेपो रेट ५.४० टक्के झाला आहे. आरबीआयनं या वर्षी सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेनं यापूर्वी मे २०२२ मध्ये अचानक रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांनी वाढ केली होती, तर जून २०२२ MPC बैठकीत ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती. अशाप्रकारे मे महिन्यापासून रेपो रेटमध्ये एकूण १.४० टक्के वाढ झाली आहे, जी गेल्या अडीच वर्षांतील सर्वोच्च आहे. या वाढीमुळं तुमचं गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. बँका देखील लवकरच त्यांचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात करतील.
रेपो रेट काय असतो?
रेपो रेट म्हणजे असा दर ज्यावर RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. त्याच पूर्ण नाव पुनरुत्पादन दर (Reproduction Rate) आहे, थोडक्यात त्याला रेपो रेट म्हणतात.
RBI hikes repo rate by 50 basis points to 5.4% with immediate effect pic.twitter.com/axs5EMdvIM
— ANI (@ANI) August 5, 2022
गव्हर्नर काय म्हणाले?
गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज ७.२ टक्के ठेवला आहे. महागाई आणि जागतिक बाजाराच्या दबावामुळं विकास दराच्या अंदाजात बदल होण्याची शक्यता यापूर्वी वर्तवली जात होती, परंतु दास यांनी आर्थिक धोरणांवर आणि देशाच्या आर्थिक सुधारणांवर विश्वास ठेवून विकास दराचा अंदाज आधीच ठरवला. ते म्हणाले, ”सध्या ग्राहक महागाई निर्देशांकातून कोणताही दिलासा नाही आणि तो ६ टक्क्यांच्या वर राहील. चालू आर्थिक वर्षातील किरकोळ महागाईचा अंदाजही त्यांनी ६.७ टक्क्यांवर ठेवला आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर ७ टक्क्यांच्या वर होता. अशा परिस्थितीत रेपो दरात सातत्यानं वाढ होत असली तरी त्याचा किरकोळ महागाईवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही.”
रिझर्व्ह बँकेनं बँकांसाठी मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) मध्येही बदल केले आहेत. गव्हर्नर दास म्हणाले, की एमएसएफचा दर सध्याच्या ५.१५ टक्क्यांवरून ५.६५ टक्के करण्यात आला आहे, तर स्थायी ठेव सुविधा (SDF) ५.१५ टक्के कायम ठेवण्यात आला आहे. मे २०२२ मध्ये, जेव्हा रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली, तेव्हा अनेक बँकांनी त्यांचे व्याजदर घाईघाईनं वाढवले होते. आज व्याजदरात ५० बेसिस पॉईंट्सची वाढ केल्यानंतर बँकांकडून कर्जाचे दर आणखी वाढवले जाऊ शकतात. FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना वाढीव व्याजदराचा लाभ मिळू शकतो.