EMI बाऊन्स झाला, तर तुमचा मोबाईल ‘लॉक’ होणार! RBI चा नवा नियम…

WhatsApp Group

RBI New EMI Rules : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन खरेदी करणे म्हणजे खिशात रोख रक्कम असावी लागते, असा नियम राहिलेला नाही. केवळ आधार कार्डच्या मदतीने EMI वर स्मार्टफोन सहज खरेदी करता येतो. ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन, EMI ही सुविधा सर्वत्र उपलब्ध आहे. मात्र, ही सोय त्याच वेळी त्रासदायक ठरते जेव्हा कोणत्याही कारणामुळे EMI बाऊन्स होते.

सध्या जरी EMI बाऊन्स झाल्यावर केवळ बँकांचे आणि एजंटांचे कॉल येतात, काही बाऊन्स शुल्क भरावे लागते, एवढ्यावरच प्रकरण आटोपते. मात्र, लवकरच हे चित्र बदलणार आहे. कारण RBI एक नवा नियम आणण्याच्या विचारात आहे – जो तुमचा फोनच लॉक करून टाकू शकतो.

EMI ऑफ, Lock ऑन – तुमचा मोबाईल बंद होणार!

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नवीन नियमावली तयार करत आहे, ज्या अंतर्गत जर ग्राहकांनी वेळेवर EMI भरली नाही, तर संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनी त्यांच्या मोबाईलमध्ये “Remote Lock” टाकू शकतील. म्हणजे तुमचा स्मार्टफोन पूर्णपणे लॉक होईल आणि तो कोणत्याही पासवर्ड, ट्रिक किंवा फॅक्टरी रीसेटने उघडणार नाही.

हेही वाचा – महाराष्ट्रात ‘फेक’ सेना कॅप्टन! वर्दी घालून फिरणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

फोनचा IMEI नंबर (International Mobile Equipment Identity) या लॉक सिस्टमशी जोडलेला असेल. म्हणजे जरी तुम्ही फोन फॉर्मॅट केला तरी ऑन झाल्यावर तो पुन्हा लॉक होणारच.

 फायनान्स कंपन्यांची जुनी खेळी – आता RBI चा हस्तक्षेप

अनेक स्मार्टफोन कंपन्या आधीपासून EMI वर फोन देतात आणि वेळेवर हप्ते न भरल्यास फोन लॉक करतात. पण ही माहिती व्यवहाराच्या अटींमध्ये स्पष्टपणे दिली जात नसे. त्यामुळे RBI ने आक्षेप घेतला होता.

आता RBI चा हेतू आहे की – ग्राहकांना पूर्ण माहिती दिली जावी. जेव्हा एखादा व्यक्ती स्मार्टफोन फायनान्स करेल, तेव्हा त्याला स्पष्ट सांगण्यात येईल की EMI चुकली तर फोन लॉक होईल आणि हा लॉक फक्त हप्ता भरल्यावरच उघडेल.

 वेळेवर EMI भरा – अन्यथा फोन फक्त पेपरवेट ठरेल

तुम्हाला पाणी नसलं तरी काही वेळ काम चालू शकतं, पण मोबाईल नसेल तर आजकाल सर्व काही थांबतं. त्यामुळे, हा नवा नियम लागू झाल्यावर जर वेळेवर EMI भरली नाही, तर तुमचा मोबाईल केवळ एक शोपीस किंवा पेपरवेट होऊन राहील.

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे ग्राहक अधिक जबाबदारीने EMI भरतील आणि बँकांचाही डिफॉल्ट रेट कमी होईल. पण याचा अर्थ असा आहे की स्मार्टफोन फक्त ‘तुमचा’ राहणार नाही, तो बँकेचा ताब्यात राहणार – जोपर्यंत तुम्ही संपूर्ण पेमेंट करत नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment