

Indian Navy Jobs : सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात अनेकजण आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी सर्वांपासून चुकते. त्यामुळेच ‘वाचा मराठी’नं पुढाकार घेत, नोकरीची संधी आणि त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यामुळं नोकरीची गरज असलेला तरुणवर्ग खालील ठिकाणी अर्ज करु शकतील.
भारतीय नौदलात सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याची चांगली संधी आहे. भारतीय नौदलाने वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) आणि मॅट्रिक भर्ती (MR) अंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा – Jio कडून खास ऑफर..! फक्त २०० रुपये जास्त देऊन मिळवा तब्बल १४ OTT सबस्क्रिप्शन
भारतीय नौदलाने SSR च्या १४०० पदांसाठी भरती घेतली आहे. त्यापैकी ११२० पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत. त्याचबरोबर २८० पदे महिला उमेदवारांची आहेत.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. इंटरमिजिएटमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र याशिवाय रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणकशास्त्रातून आणखी एक विषय असावा.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म १ मे २००२ नंतर आणि ३१ ऑक्टोबर २००५ पूर्वी झालेला असावा.
अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
- संगणकावर आधारित लेखी परीक्षा.
- पीएफटी आणि प्रारंभिक वैद्यकीय.
- अंतिम भरती परीक्षा.
अधिकृत अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा.