VIDEO : मृत्यूला जवळून पाहिलं..! रुळ ओलांडताना रिक्षाचालकासमोर आली ट्रेन, मग…

WhatsApp Group

Aligarh Rickshaw Puller Viral Video : उत्तर प्रदेशातील अलिगढमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अलिगढमधील रेल्वे ट्रॅकवरील फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायकल रिक्षाचालकाचा आहे. ज्यामध्ये रिक्षाचालक मृत्यूला तोंड देऊन माघारी परततो. या संपूर्ण घटनेनंतर रिक्षाचालक रेल्वेच्या धडकेतून थोडक्यात बचावतो. पण त्याची रिक्षा मोडून जाते. रेल्वे क्रॉसिंगचा हा व्हिडीओ अंगावर शहारा आणणारा आहे. एका सेकंदाचा आणखी एक उशीर झाला असता तर आज तो रिक्षावाला या जगात नसता.

अलिगडमध्ये एक रिक्षाचालक रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. एका रुळावर रेल्वे येत असताना, रेल्वे दिसताच तो रिक्षा सोडून पळून जातो. मात्र, रिक्षाचालक थोडक्यात बचावतो. पण त्याची रिक्षा उडून जाते. ताशी १०० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे तिथून जाते. रिक्षाचालक धक्का देऊन मागे पडतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आणि शेअर होत आहे.

हेही वाचा – SL Vs PAK : आशिया कप फायनलमधून भारतीय चाहत्यांना स्टेडियमबाहेर काढलं? पाहा VIDEO

अलिगढमधील सीमा चौकात शुक्रवारी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. इथं शुक्रवारी सकाळी रिक्षाचालक बंद रेल्वे फाटक बायपास करून ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. तेव्हापासून तो व्हायरल होत आहे. त्याचवेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

हेही वाचा – शिक्षक आहे की हैवान..? ८ वर्षाच्या विद्यार्थ्यावर फेकलं उकळतं पाणी! वाचा कारण

अलिगढचे आरपीएफ इन्स्पेक्टर राजीव वर्मा यांनी या घटनेबाबत वक्तव्य केलं. घटनेबाबत ते म्हणाले, “आम्हाला याची माहिती मिळाली आणि रिक्षाचालक तेथून पळून गेला. आम्हाला माहिती मिळताच आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यावरून आम्हाला रिक्षाचालकाची माहिती मिळाली. रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.” ही ट्रेन गुवाहाटीहून नवी दिल्लीला जात होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment