बँकेचा हप्ता वाढणार…! SBI च्या ग्राहकांना धक्का; EMI सुद्धा महागणार!

WhatsApp Group

SBI Hikes MCLR : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृहकर्ज महाग केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एका वर्षाच्या कालावधीत MCLR ०.१० टक्क्यांनी वाढवला आहे. त्यामुळे गृहकर्जासह इतर अनेक कर्जावरील व्याजदर वाढले आहेत. नवीन दर १५ जानेवारीपासून लागू झाले आहेत. SBI सध्या आपल्या सणासुदीच्या ऑफर मोहिमेअंतर्गत गृहकर्जावर विविध सवलती देत ​​आहे. हे ३१ जानेवारी २०२३ पर्यंत आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, १५ जानेवारीपासून एक वर्षाचा MCLR वाढून ८.४ टक्के झाला आहे. पूर्वी तो ८.३० टक्के होता. याशिवाय, इतर मुदतीसाठी MCLR मध्ये कोणताही बदल नाही.

SBI चा २ वर्ष आणि ३ वर्षांच्या कालावधीसाठी MCLR सध्या अनुक्रमे ८.५० टक्के आणि ८.६० टक्के आहे. त्याच वेळी, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR ८ टक्के आहे. याशिवाय ओवरनाईट MCLR ७.८५ टक्के आहे.

गृहकर्जाचे व्याजदर

SBI ने ४ ऑक्टोबर रोजी फेस्टिवल ऑफर कॅम्पेन सुरू केले. ही ऑफर ३१ जानेवारी २०२३ पर्यंत आहे. या सणासुदीच्या ऑफरमध्ये बँक अनेक गृहकर्ज श्रेणींमध्ये ०.१५ ते ०.३० टक्के सूट देत आहे. SBI गृहकर्जाचे दर देखील कर्जदाराच्या CIBIL स्कोअरवर अवलंबून असतात. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला तितका गृहकर्जाचा व्याजदर कमी. SBI ग्राहकाचा CIBIL स्कोअर ८०० किंवा त्याहून अधिक असल्यास, SBI गृहकर्जाच्या व्याजदरावर ०.१५ % सूट देते. यासह, व्याजदर सामान्य ८.९० टक्के दराऐवजी ८.७५ टक्के असेल. तुमचा CIBIL स्कोअर ७५० ते ७९९ दरम्यान असेल, तर तुम्हाला व्याजदरात ०.२५ टक्के सूट मिळेल. यासह, तुम्हाला ९ टक्क्यांऐवजी ८.७५ टक्के व्याजदर मिळेल. दुसरीकडे, जर क्रेडिट स्कोअर ७०० ते ७४९ दरम्यान असेल, तर गृहकर्जाची किंमत ०.२० टक्के सवलतीसह सामान्य दराने ९.१० टक्क्यांऐवजी ८.९० टक्के असेल.

हेही वाचा – Aadhaar Card : फक्त आधार क्रमांकाने उडणार पैसे..! ‘हा’ आहे ऑनलाईन फसवणुकीचा ‘नवा’ मार्ग

याशिवाय ७०० पेक्षा कमी क्रेडिट स्कोअरसाठी गृहकर्जाच्या दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही. कमी क्रेडिट स्कोअरबद्दल बोलायचे झाल्यास, ६५० ते ६९९ क्रेडिट स्कोअरवर SBI गृह कर्जाचा व्याज दर ९.२० टक्के आहे. जर क्रेडिट स्कोअर ५५० ते ६४९ असेल तर व्याज दर ९.४० टक्के आणि CIBIL नसल्यास ९.१० टक्के आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment