VIDEO : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं..! ७ जणांचा अंत; ‘या’ कारणामुळं अपघात

WhatsApp Group

Helicopter Crash In Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये बसलेले प्रवासी दक्षिण भारतातील असल्याचे सांगण्यात येत आहे. केदारनाथमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. केंद्रीय मंत्री अमित शहांनी या घटनेप्रसंगी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ”या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांप्रती मी शोक व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”

हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते. केदारनाथपासून ३ किमी अंतरावर असलेल्या नंदीजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्पवरून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत. डीआयजी एसडीआरएफ रिद्धिमा अग्रवाल यांनी सांगितले की, केदारनाथहून एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. लिंचोली येथून पथक पोहोचत आहे.

हेही वाचा – Viral Video : दारुडयाला चावल्यामुळं ‘किंग कोब्रा’चा मृत्यू..! पुढं काय झालं बघा

 

या घटनेत मदतकार्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे हा अपघात झाला, असे वृत्त आहे.

Leave a comment