

Share Market : राधाकिशन दमानी हे भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांच्या म्हणजेच इन्वेस्टर्सच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. सध्या त्यांचा पोर्टफोलिओ 1.59 लाख कोटी रुपयांचा आहे. दमाणी यांच्या पोर्टफोलिओमध्ये अव्हेन्यू सुपरमार्ट्स, व्हीएसटी इंडस्ट्रीज, इंडिया सिमेंट्स, ट्रेंट आणि सुंदरम फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाची शेअर बाजारातील बिग बुल म्हटली जाणारी एकूण होल्डिंग्स 39,703 कोटी रुपये आहेत. झुनझुनवाला कुटुंबाच्या पोर्टफोलिओमध्ये टायटन, स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स, मेट्रो बांद्रास, टाटा मोटर्स आणि क्रिसिलच्या शेअर्सचा समावेश आहे.
हेही वाचा – Train Ticket Discount For Patients : ‘या’ रुग्णांना ट्रेनच्या तिकिटात सवलत! वाचा आजारांची यादी
देशातील तिसरे सर्वात मोठे गुंतवणूकदार हेमेंद्र कोठारी यांच्याकडे 8,820 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ आहे. यामध्ये अल्काइल अमाइन्स केमिकल्स, सोनाटा सॉफ्टवेअर आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स सारख्या समभागांचा समावेश आहे.
दिग्गज गुंतवणूकदार आकाश भन्साळी यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुजरात फ्लोरोकेमिकल्स, रामकृष्ण फोर्जिंग्स, आयडीएफसी, सुदर्शन केमिकल आणि लॉरियस लॅबचा समावेश आहे. भन्साळींच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या समभागांचे एकूण मूल्य 4,781 कोटी रुपये आहे.
शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या मुकुल अग्रवाल यांचा पोर्टफोलिओ आकार 3,902 कोटी रुपये आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सुझलॉन एनर्जी, रेमंड, रॅडिको खेतान, इंटेलेक्ट डिझाईन आणि पीडीएसचे शेअर्स समाविष्ट आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!