

IRCTC Auto Upgradation : भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या Auto Upgradation Scheme अंतर्गत, जर तुमचं स्लीपर तिकीट कन्फर्म असेल आणि वरच्या क्लासमध्ये (AC 3, AC 2, AC 1) काही जागा रिकाम्या असतील, तर तुमचं तिकीट मोफत अपग्रेड केलं जातं. विशेष म्हणजे, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही.
ही स्कीम कशी काम करते?
उदाहरणार्थ, जर एखाद्या ट्रेनच्या फर्स्ट AC मध्ये 4 जागा रिकाम्या असतील आणि सेकंड AC मध्ये काही प्रवासी असतील, तर त्यांना फर्स्ट AC मध्ये शिफ्ट केलं जातं. त्यानंतर सेकंड AC रिकामी होतो आणि तिथे थर्ड AC प्रवाशांना जागा दिली जाते. अशा पद्धतीने एकही बर्थ रिकामी राहत नाही आणि प्रवाशांनाही वरच्या क्लासमध्ये प्रवासाचा अनुभव मिळतो.
कोणाचे तिकीट अपग्रेड होते?
IRCTC वर तिकीट बुक करताना “Auto Upgradation” नावाचा पर्याय विचारला जातो. जर तुम्ही ‘होय’ (Yes) निवडलं, तर अपग्रेडचा चान्स मिळतो. जर काहीही निवडलं नसेल, तरीही IRCTC ते ‘होय’ मानतो. म्हणून बुकिंग करताना हे लक्षात ठेवा.
PNR बदलतो का?
अपग्रेड झाल्यावर तुमचा PNR नंबर बदलत नाही. प्रवासाच्या माहितीकरता तोच नंबर वापरता येतो. आणि जर तिकीट कॅन्सल केलं, तर मूळ वर्गानुसार (Original class) रिफंड दिला जातो, अपग्रेड वर्गानुसार नाही.
जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि थोडेसे नशीब तुमच्यासोबत असेल, तर स्लीपर तिकीट घेऊनही तुम्ही AC मध्ये प्रवास करू शकता, तेही कोणतेही अतिरिक्त पैसे न देता! त्यामुळे पुढच्या वेळी तिकीट बुक करताना ‘Auto Upgradation’ पर्याय ‘होय’ वर ठेवा आणि या खास सुविधेचा लाभ घ्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!