सोनम रघुवंशी बेवफा है! अरेंज मॅरेज, हनिमून आणि नवऱ्याला मारण्याची सुपारी

WhatsApp Group

Sonam Raghuvanshi Case : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राजा रघुवंशी याच्या हत्येचे गूढ उलगडले आहे. राजा रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यावर त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. हे जोडपे त्यांच्या हनिमूनसाठी इंदूरहून मेघालयला गेले होते, जिथे राजा रघुवंशीची हत्या झाली.

राजाचा मृतदेह सापडल्यानंतर, सोनम १७ दिवसांपासून बेपत्ता होती आणि सर्वांना वाटले की ती पीडित आहे. सुरुवातीला असे वाटत होते की कोणीतरी तिचा पती राजाला मारले आहे आणि ती देखील बेपत्ता आहे. आता सत्य बाहेर आल्यानंतर, संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.

सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये आत्मसमर्पण केले. दरम्यान, आज उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर सोनम आढळली. मेघालय डीजीपींनी सांगितले की सोनमने स्वतः गाझीपूर पोलिसांना फोन करून आत्मसमर्पण केले. राजा रघुवंशी हत्याकांडाशी संबंधित ३ जणांनाही मेघालय पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे तिन्ही आरोपी इंदूरचे रहिवासी आहेत. इंदूर पोलीस या तपासात मेघालय पोलिसांनाही मदत करत आहेत. मेघालय पोलीस लवकरच राजा रघुवंशीच्या हत्येशी संबंधित इतर माहिती शेअर करतील.

सोनम आणि राजा रघुवंशी यांचे ११ मे रोजी लग्न झाले. त्यानंतर दोघेही २० मे रोजी मेघालयातील शिलाँगला हनिमूनसाठी गेले होते, परंतु २३ तारखेला दोघेही बेपत्ता झाले.

काही दिवसांनी, २ जून रोजी, राजाचा मृतदेह वैसावडोंग धबधब्याजवळील एका खोल खड्ड्यात आढळला. त्याच्या हातावरील टॅटूवरून मृतदेहाची ओळख पटली, परंतु सोनमचा अद्याप पत्ता लागला नाही.

राजाच्या लपलेल्या मृतदेहाचा शोध हा तपासातील महत्त्वाचा टप्पा होता, त्यानंतर बेपत्ता सोनम संशयाच्या भोवऱ्यात आली.

येथे एका गाइडच्या साक्षीने या हत्येच्या गूढतेत मोठा वळण आणले. मेघालयातील या मार्गदर्शकाने सांगितले की त्याने २३ मे रोजी राजा आणि सोनमला तीन पुरुषांसोबत जाताना पाहिले होते. येथेच पोलिसांना तीन संशयितांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली.

तिकीटातही एक ट्विस्ट  

खरं तर, राजाच्या आईने सांगितले की सोनमने हनिमूनची योजना आखली होती आणि तिने तिकीट बुक केले होते. पण, पोलिसांना असाही एक सुगावा सापडला की सोनमने प्रवासाचे तिकीट बुक केले होते पण परतीचे तिकीट बुक केले नव्हते.

प्रियकराच्या मदतीने हत्येचा कट रचला

सोनमच्या अटकेनंतर अनेक खुलासे झाले आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक तपासात सोनम आणि तिच्या कुटुंबाचा प्लायवूडचा व्यवसाय असल्याचे समोर आले आहे. या दुकानात राज कुशवाह नावाचा एक कर्मचारी काम करत होता. सोनम आणि राज यांचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. सोनम तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या कर्मचाऱ्यावर प्रेम करत होती, लग्नाच्या अवघ्या ६ दिवसांनी तिने हत्येची योजना आखली होती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment