Sonu Nigam Birthday : “सूरज हुआ मद्धम..”, गायलेल्या सोनू निगमकडं आहे आज ‘इतक्या’ कोटींची संपत्ती!

WhatsApp Group

Happy Birthday Sonu Nigam : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम ९०च्या दशकापासून आतापर्यंत आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य करत आहे. गाण्यापासून अभिनयापर्यंत ठसा उमटवणारा सोनू निगम आज ३० जुलैला त्याचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. १९७३ साली फरीदाबादमध्ये जन्मलेल्या सोनू निगमनं आपल्या आवाजाच्या जादूनं एक वेगळं स्थान मिळवलं आहे, त्यानंही आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला. बॉलिवूडमधील तो जगातील सर्वात महागड्या गायकांपैकी एक आहे आणि तो करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे.

पहिला ब्रेक!

सोनू निगमला गाण्याचा वारसा वडिलांकडून मिळाला आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सोनू निगमनं वडील आगम निगम यांच्यासोबत स्टेज शो, पार्ट्या आणि फंक्शन्समध्ये गाणं सुरू केलं. सोनू निगमवर दिग्गज गायक मोहम्मद रफींचा सुरुवातीपासूनच खूप प्रभाव होता आणि सुरुवातीच्या काळात तो स्टेजवर रफी साहबांची गाणी म्हणत असे. सोनू १८-१९ वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला मुंबईला घेऊन गेले. सोनू निगमला प्रथम टी-सीरीजनं ब्रेक दिला आणि ‘रफी की यादों’ नावानं त्यानं गायलेल्या गाण्यांचा अल्बम रिलीज केला. पाच वर्षांच्या संघर्षानंतर त्याला ‘बेवफा सनम’मध्ये गाण्याची संधी मिळाली. चित्रपटातील ‘अच्छे सिला दिया तुने मेरे प्यार का’ हे गाणं सुपरहिट ठरलं. यानंतरही सोनूनं स्वत:साठी एक मोठं स्थान निर्माण केलं.

हेही वाचा – Commonwealth Games 2022 : टीम इंडियाच्या जर्सीवर अशोकचक्र का नाही? ‘हे’ आहे कारण!

सोनू निगमची संपत्ती!

चित्रपटांमध्ये गाण्यापासून ते अभिनय आणि शो होस्ट करण्यापर्यंत, सोनू निगम प्रत्येक पात्रात बसतो. आपल्या व्यक्तिमत्त्वात नेहमी साधेपणा पसरवणारा गायक सोनू निगम हा देशातील सर्वात श्रीमंत गायकांपैकी एक आहे. आलिशान वाहनांपासून ते आलिशान घरांपर्यंत सोनू निगम भव्य आयुष्य जगतो. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू निगमची एकूण संपत्ती ५० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे ३७० कोटी असू शकते.

सोनू निगमलाही आलिशान कारची आवड आहे. त्यांच्याकडे रेंज रोव्हरपासून ऑडी आणि बीएमडब्ल्यूपर्यंत महागडी वाहनं आहेत. सोनूला बाइक्सचाही खूप नाद आहे. सोनूच्या गोड आवाजाचं लाखो लोकांना वेड लागलं. बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याच्या गायकीतून तो कमावतोच, पण त्याच्या मैफिलींनाही खूप मागणी असते. रिपोर्टनुसार सोनू प्रत्येक कॉन्सर्टसाठी १० ते १५ लाख रुपये आकारतो. याशिवाय, लाइव्ह इव्हेंट्स आणि रेकॉर्डिंग, ब्रँड एंडोर्समेंट, टीव्ही शो होस्टिंग इत्यादींमधून तो एका वर्षात पाच कोटींहून अधिक कमावतो.

Leave a comment