

SSC GD Constable Recruitment 2022 : सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात अनेकजण आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी सर्वांपासून चुकते. त्यामुळेच ‘वाचा मराठी’नं पुढाकार घेत, नोकरीची संधी आणि त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यामुळं नोकरीची गरज असलेला तरुणवर्ग खालील ठिकाणी अर्ज करु शकतील.
स्टाफ सिलेक्शन कमिशन, SSC द्वारे आयोजित GD कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. आयोगाने उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत जीडी कॉन्स्टेबलच्या ४५ हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी दिली आहे, अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही सुरक्षा दलात हवालदाराची नोकरी मिळवायची असेल आणि अद्याप अर्ज केला नसेल. भरतीसाठी, म्हणून शक्य तितक्या लवकर अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देऊन अर्ज करा.
हेही वाचा – भारतापेक्षा अमेरिकेत तांदूळ ८ पट महाग, टॅक्सीचं भाडं तर विचारूच नका!
भरती प्रक्रियेद्वारे, CISF, CRPF, SSB, आसाम रायफल्स, ITBP सह इतर सुरक्षा दलांमध्ये जनरल ड्युटी कॉन्स्टेबलच्या ४५,२८४ पदे भरली जातील. यापूर्वी पदांची संख्या २४,३६९ होती. जे नुकतेच आयोगाने ४५२८४ पर्यंत वाढवले आहे. यामध्ये बीएसएफमध्ये २०,७५६ सीआयएसएफमध्ये ५९१४, सीआरपीएफमध्ये ११,१६९, एसएसबीमध्ये २१६७, आयटीबीपीमध्ये १७८७, आसाम रायफल्समध्ये ३१५३ आणि एसएसएफमध्ये १५४ पदांचा समावेश आहे.
१८-२३ वयोगटातील १०वी उत्तीर्ण उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र, महिला आणि एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या व्यतिरिक्त इतर माहितीसाठी उमेदवारांनी या लिंकवर क्लिक करा.