शिक्षकाचे संतापजनक कृत्य! रस्त्याने जाणाऱ्या मुलीला शाळेत बोलावलं आणि…

WhatsApp Group

Teacher Raped Girl In Government School : पश्चिम राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यात लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे शाळेतील शिक्षकाने रस्त्याने चालणाऱ्या एका मुलीला बोलावून धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी गर्भवती राहिली. ही बाब समजल्यानंतर आरोपीने पीडितेसाठी गर्भधारणा करण्यासाठी औषधे आणली. त्यामुळे तिची प्रकृती ढासळली. कुटुंबीयांनी मुलीला रुग्णालयात आणल्यानंतर ही बाब उघडकीस आली. ती गर्भवती असल्याचे ऐकून पीडितेच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. पीडित महिला तीन महिन्यांची गर्भवती आहे.

शाळेजवळून जाताना मुलीला बोलावलं…. (Crime News In Marathi)

पोलिसांनी सांगितले की, परिसरातील एका गावातील सरकारी शाळेत काम करणार्‍या बाला राम या शिक्षकाने तीन महिन्यांपूर्वी मुलीला शाळेजवळून जात असताना आत बोलावले. सुरुवातीला मुलीने नकार दिला. मात्र शिक्षकाने तिच्यावर दबाव टाकून तिलाा शाळेत बोलावले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घाबरून ती मुलगी गप्प राहिली. त्यानंतरही आरोपीने मुलीला धमकावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. यामुळे ती गर्भवती राहिली. मुलीच्या गर्भधारणेची माहिती मिळाल्यानंतर शिक्षक बाला रामने तिला गर्भपात करण्यासाठी औषधे दिली.

सोनोग्राफीत उघड झाली घटना (Marathi Crime News)

ती औषधे खाल्ल्यानंतर मुलीची प्रकृती खालावली. यावरून तिच्या कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तेथे मुलीला सोनोग्राफी करून घेण्यास सांगितले. यावर कुटुंबीयांनी पीडितेला बाडमेरच्या जिल्हा रुग्णालयात आणले. येथे त्यांनी मुलीची सोनोग्राफी करून घेतली. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. हे ऐकून कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीची विचारपूस केली असता तिने सगळी हकीकत सांगितली.

हेही वाचा – आई आणि मुलीचा बॉयफ्रेंड एकच, लग्नाची वेळ आल्यावर एकीला संपवलं!

शिक्षक फरार (School Teacher Crime News)

त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेचा जबाब घेता. पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध बलात्कार आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, मुलीची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच आरोपी शिक्षक बाला राम फरार झाला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. पीडितेवर बाडमेरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment