

Teacher Threw Hot Water On Student : कर्नाटकातील रायचूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निष्पाप विद्यार्थ्याला शिक्षकाच्या पराकोटीच्या रागाचं शिकार व्हावं लागलं. रागाच्या भरात शिक्षकानं या विद्यार्थ्याच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. यानंतर विद्यार्थ्याचं शरीर ४० टक्के भाजलं. आठ वर्षीय विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आवं. या घटनेनंतर तो वेदनेनं आक्रोश करत आहे. या कृत्यानंतर शिक्षक फरार झाला आहे.
शिक्षकाला का आला राग?
कर्नाटकातील रायचूरची ही घटना जितकी वेदनादायक आहे तितकीच चिंताजनक आहे, शेवटी एक शिक्षक या कृतीपर्यंतच जातोच कसा, असा प्रश्न चर्चेत उपस्थित होत आहे. रायचूरच्या श्रीगणमथेश्वर सिनियर स्कूलच्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अखिलसोबत ही वाईट घटना घडली, त्याचा दोष एवढाच होता की, तो २ सप्टेंबर रोजी त्यानं पँटमध्ये शौच केलं. रागाच्या भरात शिक्षकाने उकळतं पाणी अखिलवर फेकलं.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार BA ची परीक्षा..! हॉल तिकीटचा PHOTO व्हायरल
Teacher threw hot water on a student of class II, badly scorched, admitted to the hospital. Karnataka News Raichur Student suffers 40% burn after teacher throws hot water https://t.co/KETnq4PovA
— imran khan (@Khan279Imran) September 9, 2022
कारवाईची मागणी!
या निष्पाप मुलाचे आई-वडील अत्यंत गरीब आहेत, त्यांच्यावर उपचार करणंही त्यांना शक्य नाही. त्याचबरोबर शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी गावातील लोकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आता शिक्षण विभागानं पोलिसांकडं दिली आहे. सध्या आरोपी शिक्षक फरार असून तो या घटनेपासून शाळेत आलेला नाही. जर हा आरोप खरा असेल तर शिक्षकाला तात्काळ बडतर्फ करून कुटुंबाला योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी गावतील लोकांनी केली आहे.
शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं…
या प्रकरणी रायचुरूचे जिल्हा शिक्षण अधिकारी चेतन कुमार यांनी सांगितलं, की तपास पथकानं दिलेल्या माहितीच्या आधारे विभागानं मस्की पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोषी कोणीही असो, शाळेचे कर्मचारी असो की अन्य कोणी, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असं आवाहन आम्ही पोलिसांना केलं आहे.