काहींना बोनस, तर काहींना थेट ४ लाख..; लोकसंख्या वाढवण्यासाठी ‘हे’ देश देतायत आकर्षक बक्षीसं!

WhatsApp Group

मुंबई : लोकसंख्येच्या दृष्टीनं चीनचा जगात पहिला क्रमांक लागतो तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र, ज्या गतीनं भारताची लोकसंख्या वाढत आहे त्यानुसार भारत चीनलाही लवकरच मागं टाकेल असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. परंतु जगाच्या पाठीवर अजूनही असे अनेक देश आहेत ज्यांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. या देशांमध्ये जन्मदर सातत्यानं कमी होत आहे. अहवालानुसार, या शतकाच्या अखेरीस या देशांमध्ये लोकसंख्येचे गंभीर संकट उद्भवू शकते. हे पाहता या देशांतील सरकारं नवनवीन पद्धतींचा अवलंब करून लोकांना विवाह करण्यास व मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहन देतात.

‘या’ देशात लग्न करण्यासाठी मिळतात ४ लाख रुपये!

गेल्या अनेक वर्षांपासून जपानमध्ये लोकसंख्येच्या कमतरतेचे संकट आहे. या शतकाच्या अखेरीस जपानची लोकसंख्या सध्याच्या लोकसंख्येच्या निम्मी होईल, असं लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. २०१७च्या जनगणनेनुसार, जपानची एकूण लोकसंख्या १२.८० दशलक्ष होती. अशा परिस्थितीत जपान सरकार तिथल्या लोकसंख्येचा समतोल साधण्यासाठी सातत्यानं पावलं उचलत आहे.

जपान सरकारनं लोकसंख्या वाढवण्यासाठी बजेटमध्ये दोन ते तीन टक्के वाढ केली आहे. त्यासाठी विशेष योजनाही सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जपानमध्ये स्थायिक होणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून सरकार सुमारे ४ लाख २५ हजार रुपये देत आहे. याचे कारण म्हणजे लोकांनी लवकर लग्न करावीत आणि मुलांना जन्म द्यावा.

मुलाच्या जन्मावर आईला मिळतं ‘गिफ्ट’!

रशियाची एकूण लोकसंख्या सुमारे १४० दशलक्ष आहे. येथेही घटती लोकसंख्या चिंतेचं कारण आहे. यामुळेच येथील सरकार लोकांना लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सातपेक्षा जास्त मुलं जन्माला घालणाऱ्या कोणत्याही महिलेला ‘ऑर्डर ऑफ पॅरेंटल ग्लोरी’ पुरस्काराने गौरविण्यात येईल, असा निर्णयही येथील सरकारनं काही काळापूर्वी घेतला होता. एवढंच नाही तर १२ सप्टेंबर २००७ रोजी ‘कन्सेप्शन डे’ म्हणून रशियामध्ये एक विशेष दिवसही घोषित करण्यात आला. मुलाच्या जन्मानंतर महिलांना कार आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट देण्यासही इथं सुरुवात झाली.

इटलीत मिळतं ‘असं’ बक्षीस!

इटलीची एकूण लोकसंख्या सुमारे ५० दशलक्ष आहे. रिपोर्ट्सनुसार, इटलीमध्ये जन्मदर झपाट्यानं कमी होत आहे. त्यामुळं सरकार नवनवीन मोहिमा राबवत आहे. उदाहरणार्थ, मूल होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला सरकारकडून ७० हजार रुपये दिले जातात.

हेही वाचा – अणुबॉम्ब टाकून चंद्रच उडवायचा होता, पण…! अमेरिकेचं ‘ते’ मिशन का फसलं?

तीन मुलांच्या कुटुंबाला मिळतात २५ हजार रुपये बोनस!

युरोपियन देश एस्टोनियाची लोकसंख्या सुमारे १.३ दशलक्ष आहे. येथे निर्माण झालेल्या लोकसंख्येच्या संकटामुळे इथलं सरकार नोकरी करणाऱ्यांना गर्भवती महिलेला दीड वर्ष पूर्ण पगारी रजा मिळते. इतकंच नाही तर तीन मुलं असलेल्या कुटुंबाला दरमहा ३०० युरो म्हणजेच सुमारे २५ हजार रुपये बोनसही दिला जातो.

इराणमध्ये कुटुंबाला अतिरिक्त रेशन!

इराणमधील लोकसंख्या ८४ दशलक्ष आहे. इथंही सरकार लोकसंख्या वाढवण्यासाठी विविध पावलं उचलत असतं. इथं परिस्थिती अशी आहे, की ज्या महिलांना आरोग्याच्या कारणांमुळं औषध घेणें आवश्यक आहे त्यांनाच गर्भनिरोधक औषधे दिली जातात. तसेच, जास्त मुलं जन्माला घालणाऱ्या कुटुंबाला अतिरिक्त रेशन दिलं जातं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment