

Tirupati Mumtaz Hotel Project : आंध्र प्रदेश सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेत तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या पवित्र भूमीवर होणारा ओबेरॉय ग्रुपचा ‘मुमताज हॉटेल प्रोजेक्ट’ तात्काळ रद्द करून दुसरीकडे हलवला आहे.
हा निर्णय मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. सरकारने स्पष्ट केलं की, हा निर्णय तिरुमलाच्या धार्मिक पवित्रतेचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक होता.
विरोध आणि जनतेचा रोष
फेब्रुवारी २०२५ मध्ये, तिरुमलातील अनेक संतांनी या हॉटेल प्रकल्पाच्या विरोधात भूखहडताल सुरु केली होती. त्यांच्या मते, सात पवित्र टेकड्यांच्या पावित्र्याला धक्का पोहोचवणारा हा प्रकल्प त्वरित थांबवायला हवा. संतांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना पत्र लिहून उत्तरही मागितले होते.
ओबेरॉय ग्रुपला दिली दुसरी जागा
पूर्वीच्या YSRCP सरकारने २०२१ मध्ये TTDच्या २० एकर जमीन ओबेरॉय ग्रुपला दिली होती. मात्र आता हा प्रोजेक्ट तिरुपती ग्रामीण भागातील पेरुरु गावात हलवण्यात येणार आहे. त्यासाठी ३८ एकर वैकल्पिक जमीन दिली जाणार आहे.
ही जमीन पूर्वी “टेम्पल्स ऑफ इंडिया” थीम पार्कसाठी आरक्षित होती, पण आता ती ओबेरॉय रिसॉर्ट प्रोजेक्टसाठी वापरली जाईल.
हॉटेलचे टेंडर्स रद्द, खासगीकरणाला सरकारचा विरोध
मार्च २०२५ मध्ये नायडू यांनी स्पष्ट घोषणा केली होती की, “TTD च्या कुठल्याही जमिनीचा खासगीकरणासाठी वापर होणार नाही.” त्यांनी सर्व टेंडर्स रद्द करून पूर्वीच्या सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटलं, “पूर्वीच्या सरकारने मुमताज हॉटेल आणि देवलोक प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यांनी नावं बदलून काम चालवलं, पण आम्ही तसं होऊ दिलं नाही.”
शाकाहारी हॉटेलही नकोच!
ओबेरॉय ग्रुपने कथितपणे या पवित्र परिसरात फक्त शाकाहारी अन्नच देण्याचं आश्वासन दिलं होतं. तरीसुद्धा नायडू सरकारने खाजगी संस्थांना तिरुमलामध्ये प्रवेश नाकारण्याचं धोरण कायम ठेवलं. सरकारने कंपनीला दुसरी जागा देऊन प्रोजेक्ट पूर्ण करण्यास परवानगी दिली, पण तिरुमलाच्या जमिनीवरील कोणताही व्यावसायिक हस्तक्षेप नाकारला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!