ट्रम्प टॅरिफ बॉम्बचा भारताच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका! लाखो नोकऱ्या धोक्यात, GDP कोसळणार?

WhatsApp Group

Trump Tariff India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. अमेरिकेने भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावण्यासाठी अधिसूचना जारी केली असून 27 ऑगस्टपासून एकूण 50% टॅरिफ लागू होणार आहे. या निर्णयाचा परिणाम केवळ भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा बसू शकतो. विशेषतः भारताच्या GDP, नोकऱ्या आणि निर्यात क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताची अर्थव्यवस्था धोक्यात

दरवर्षी भारत सुमारे 80 अब्ज डॉलरचा निर्यात व्यापार अमेरिकेसोबत करतो, जो भारताच्या एकूण निर्यातीच्या सुमारे 18% आणि देशाच्या GDP च्या जवळपास 2.5% एवढा आहे. जर ट्रम्प यांच्या धोरणामुळे या निर्यातीमध्ये 50% पर्यंत घट झाली, तर त्याचा थेट परिणाम देशाच्या GDP वर होऊन 0.4% पर्यंत घसरण होऊ शकते.

लाखो नोकऱ्यांवर टांगती तलवार

वित्तीय वर्ष 2026 मध्ये भारताची विकासदर 6% च्या खाली जाण्याचा धोका आहे. रुपयाची किंमत घटण्याची शक्यता आहे आणि खासगी गुंतवणुकीत मोठी घट होऊ शकते. डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरही त्याचा गंभीर परिणाम होईल, ज्यामुळे अब्जोंचा तोटा संभवतो. फार्मास्युटिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससारखे काही क्षेत्र टॅरिफमुक्त राहू शकतात, परंतु सर्व्हिस सेक्टरवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लाखो नोकऱ्या धोक्यात येतील आणि बेरोजगारी वाढेल.

टॅरिफचा सर्वाधिक फटका बसणारे क्षेत्रे:

1. टेक्सटाइल्स आणि अपेरल:

या क्षेत्रातून दरवर्षी 10 ते 15 अब्ज डॉलरची निर्यात होते. टॅरिफमुळे वियतनाम आणि इंडोनेशियासारख्या देशांना ऑर्डर वळू शकतात, ज्यामुळे भारताची स्पर्धात्मकता कमी होईल आणि लाखो कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येतील.

2. जेम्स आणि ज्वेलरी:

या क्षेत्राचा 9 ते 10 अब्ज डॉलर निर्यात व्यापार असतो. जर शिपमेंटवर अडथळा आला, तर लाखो कारागिरांच्या उपजीविकेवर गदा येईल. सरकारने दुबई आणि मेक्सिकोमध्ये नवीन युनिट्स सुरू करण्याची योजना आखली असली, तरी ती प्रक्रिया वेळखाऊ ठरू शकते.

हेही वाचा – Viral Video : भोजपुरी गाणं ऐकताच सापाने केलं असं काही, पब्लिकला हसू आवरत नाहीये!

3. ऑटो पार्ट्स:

सुमारे 7 अब्ज डॉलरचा व्यापार या क्षेत्रात आहे. टॅरिफमुळे किंमती आणि स्पर्धा वाढेल, ज्यामुळे कार, ट्रक आणि ट्रॅक्टर पार्ट्स इंडस्ट्रीतील हजारो नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

या क्षेत्रांनाही बसणार धक्का:

या क्षेत्रांनाही बसणार धक्का:

  • सी-फूड: 2 ते 3 अब्ज डॉलर (सुमारे ₹24,000 कोटी) निर्यात प्रभावित होण्याची शक्यता. ऑर्डर रद्द झाल्यास लाखो मजुर व शेतकऱ्यांवर परिणाम होईल. इक्वाडोर आणि वियतनामसारख्या देशांना फायदा मिळू शकतो.
  • कार्पेट मेकिंग: या क्षेत्रातील 60% निर्यात प्रभावित होऊ शकते. जवळपास 25 लाख लोक यामुळे बाधित होऊ शकतात.
  • लेदर, केमिकल्स आणि मेकॅनिकल मशिनरी: या क्षेत्रांच्या निर्यातीमध्ये घट होऊन लाखो लोकांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment