

Twin Sisters Married One Man : जुळ्या आयटी इंजिनिअर तरुणींनी एकाच तरुणाशी लग्न केल्याची अनोखी घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली. अतुल असे वराचे नाव आहे. तर रिंकी-पिंकी या मुंबईतील कांदिवलीतील आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यांच्या भेटीची ही कहाणी वेगळी आहे.
रिंकी-पिंकीने सांगितले की, ते एकमेकांशिवाय काही काळही राहू शकत नाहीत, म्हणून त्यांनी एकाच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
एक संकटात तर दुसरा दुःखात
रिंकी आणि पिंकी ह्या जुळ्या सारख्या दिसतात. त्या लहानपानापासून एकत्र वाढल्या आहेत त्यांना एकमेंकांची इतकी सवय आहे कि त्या एकमेकांपासून थोड्या पण लांब नाही राहू शकत. त्या एकाच ताटात जेवण करतात. सारखे कपडे घालतात. एकवर संकट आले असेल तर दुस-याला त्याचा त्रास होतो.
एकाच कंपनीत काम
रिंकी आणि पिंकी ह्या दोघी उच्चशिक्षित आहेत. दोघीही एकाच शाळेत, वर्गात, महाविद्यालयात शिकल्या आणि आता त्या दोघी एकाच IT कंपनीत काम देखील करतात.
हेही वाचा – Aadhaar : आधार अपडेट करण्यासाठी फक्त ‘इतके’ पैसे द्या; तुम्ही जास्त तर देत नाही ना?
मरेपर्यंत वेगळे व्हायचे नाही
रिंकी आणि पिंकी म्हणतात त्या एकत्र जन्माला आल्या आहेत आणि त्यांना एकत्रच मरायचे आहे. एकमेकांपासून थोडा वेळही दूर राहू शकत नाही.
अशी झाली अतुलशी भेट
या मुलींच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. नंतर आई आजारी पडल्यानंतर दोन्ही बहिणी अतुलच्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या गाडीतून हॉस्पिटलला जात होत्या. यादरम्यान त्या अतुलच्या संपर्कात आला. अतुलने त्यांची खूप मदत केली. अतुलचा मुंबई येथे ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय आहे.
सोशल मीडियावर व्हायरल लग्न
हा अनोखा विवाहसोहळा शनिवारी अकलूज घमपूर रोडवर असलेल्या गलांडे हॉटेलमध्ये पार पडला. लग्नासाठी जवळपास 300 पाहुणे जमले होते.