रतन टाटांचे मृत्यूपत्र : संपत्तीचा एक वाटा नोकर आणि श्वानासाठी; शंतनू नायडूचे कर्ज माफ

WhatsApp Group

Ratan Tata’s will : उद्योगपती रतन टाटा यांचे या महिन्याच्या 9 तारखेला निधन झाले. आयुष्यभर साधेपणाचे उदाहरण जपलेल्या रतन टाटा यांनी मृत्यूनंतरही औदार्याचा दाखला दिला. टाटांचे मृत्युपत्र समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी आपला पाळीव श्वान जर्मन शेफर्ड ‘टिटो’साठी देखील संपत्तीचा एक भाग ठेवला आहे. या मृत्युपत्रात त्यांचा स्वयंपाकी राजन शॉ आणि बटलर सुब्बिया यांच्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.

एका अहवालानुसार, रतन टाटा यांची वैयक्तिक संपत्ती अंदाजे 10,000 कोटी रुपये आहे. त्यांचा भाऊ जिमी टाटा, त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि दिना जीभोय यांच्यासाठी मृत्यूपत्रातही एक भाग ठेवण्यात आला आहे, तर उर्वरित बहुतेक मालमत्ता त्यांच्या स्वतःच्या फाउंडेशनला देण्यात आली आहे, जी टाटा कुटुंबाची परंपरा आहे.

रतन टाटांच्या मालमत्तेचा काही भाग ‘टिटो’साठी ठेवण्यात आला आहे. यासह, जोपर्यंत ‘टिटो’ जिवंत आहे, तोपर्यंत त्याची ‘अमर्याद’ काळजी घेतली जाईल. 6 वर्षांपूर्वी त्यांनी हा श्वान पाळला होता. भारतात, एखादी मालमत्ता आपल्या पाळीव प्राण्याच्या नावावर ठेवणे ही एक नवीन घटना असू शकते. पण परदेशात अशी परंपरा फार पूर्वीपासून आहे.

हेही वाचा – Video : मुंबईत रिक्षाने प्रवास करताय? पाहा पैशासाठी कसा वाढवला जातो मीटर!

रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात राजन शॉ, ज्यांनी त्यांच्यासाठी बराच काळ स्वयंपाकी म्हणून काम केले. जवळपास 30 वर्षे त्यांचे बटलर म्हणून काम केलेले सुब्बिया यांच्यासाठीही मालमत्तेची तरतूद करण्यात आली आहे. रतन टाटा यांचे त्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांशी इतके घनिष्ठ नाते होते की, परदेश दौऱ्यावरून परतताना ते त्यांच्यासाठी डिझायनर कपडे आणत असत.

शंतनू नायडूचे कर्ज माफ

रतन टाटा यांचा दीर्घकाळचा सहकारी शंतनू नायडू यालाही त्यांच्या मृत्युपत्रात स्थान मिळाले आहे. शंतनू नायडूच्या ‘Goodfellows’ या स्टार्टअपमधील रतन टाटा यांची हिस्सेदारी आता संपुष्टात आली आहे. एवढेच नाही तर शंतनूला परदेशात शिक्षणासाठी दिलेले कर्जही माफ करण्यात आले आहे.

याशिवाय रतन टाटांची बहुतांश संपत्ती ही टाटा सन्स आणि टाटा समूहाच्या विविध कंपन्यांमधील त्यांची हिस्सेदारी आहे. ती आता रतन टाटा एंडॉवमेंट फाउंडेशन (RTEF) कडे हस्तांतरित केली जाईल. हे फाउंडेशन ना-नफा कामांसाठी निधी उपलब्ध करून देईल. एवढेच नाही तर रतन टाटा यांनी स्टार्टअप्समध्ये त्यांच्या वैयक्तिक क्षमतेने केलेली गुंतवणूक रद्द केली जाईल आणि पैसे या फाउंडेशनला हस्तांतरित केले जातील.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment