आई आणि मुलीचा बॉयफ्रेंड एकच, लग्नाची वेळ आल्यावर एकीला संपवलं!

WhatsApp Group

Up Crime News In Marathi : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या केली. ही घटना आत्महत्या भासवण्यासाठी या मुलीला गळफास लावण्यात आला. या तरुणाचे मुलगी आणि तिची आई या दोघांशीही प्रेमसंबंध होते. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने तरुणावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

…हत्या करून मृतदेह लटकवला! (Crime News In Marathi)

तरुणाने लग्नास नकार दिला. मात्र मुलगी ठाम राहिल्याने तिच्या प्रियकराने तिची हत्या करण्याचा कट रचला. त्यानंतर संधी मिळताच त्याने आपल्या अल्पवयीन मैत्रिणीचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरण लपवण्यासाठी आरोपीने त्याच्या एका साथीदारासह मुलीची हत्या करून तिचा मृतदेह लटकवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा (Crime News In Marathi)

गोरखपूरचे एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी गोरखपूर पोलीस लाइन व्हाईट हाऊसमध्ये सांगितले की, हे प्रकरण 26 सप्टेंबरचे आहे. कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. दुसऱ्या दिवशी आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुलीने आत्महत्या केली नसून तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – शेळ्यांविरुद्ध FIR नोंदवण्यासाठी शेतकऱ्यानं गाठलं पोलीस स्टेशन!

मुलीचे वडील मुंबईत राहतात. आपल्या मुलीच्या मृत्यूची बातमी मिळताच, ते घरी परतले आणि त्याने तिच्या हत्येचा आरोप करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यानंतर पुरावे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी सुनील गौरला ताब्यात घेतले. या खून प्रकरणात सुनील आधीच संशयाच्या भोवऱ्यात होता. चौकशीत त्याने घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.

आरोपीचे आई आणि मुलगी या दोघींशी अनैतिक संबंध (Crime News In Marathi)

या तरुणाचे त्याच्या मैत्रिणीच्या आईसोबतही अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांनी उघड केले. तो त्याच्या गावी पोचवायला यायचा. त्यानंतर त्याने आई आणि मुलगी दोघांशी संबंध प्रस्थापित केले. मुलीच्या हत्येच्या दिवशी मुलीची आई कोणाचा तरी मृत्यू झाल्याने तिचे सांत्वन करण्यासाठी गेली होती. मुलगी एकटी पाहून आरोपी तरुणीकडे गेला. लग्नावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातून आरोपीने आधी मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर गळा दाबून खून केला. यानंतर त्याने त्याच्या एका मित्राची मदत घेतली.

दोघांनी मिळून मुलीला कपड्याने छताला लटकवले. मुलीने आत्महत्या केली आहे, अशी दिशाभूल करण्याचा दोघांनीही प्रयत्न केला, पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खून झाल्याचे उघड झाले आणि ते पकडले गेले. सध्या पुढील कार्यवाही सुरू आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment