VIDEO : प्लॅटफॉर्मवरून तो खाली पडला, अंगावरून ट्रेन गेली, मग पुढे जे झालं ते…!

WhatsApp Group

Man Survives After Train Pass Over Him : नशीब बलवत्तर असेल, तर आपण मृत्यूलाही दूर ढकलू शकतो, असं म्हणतो. याची प्रचिती एका व्हायरल व्हिडिओमुळे झाली आहे. संपूर्ण ट्रेन रुळांवर पडलेल्या एका प्रवाशाच्या अंगावरून गेली आणि तो पूर्णपणे बचावला. हो हे खरं झालं आहे. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून ही घटना समोर आली आहे. या माणसाचं नशीब इतकं बलवत्तर होतं, की तो ट्रेनखाली पडूनही बचावला. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या लोकांना वाटत होतं की, हा माणूस जिवंत असणार नाही, पण ट्रेन पुढे जाताच तो तरुण लगेच उठला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शहरातील भरठाणा रेल्वे स्थानकाची आहे. रुळ ओलांडत असताना प्रवासी रेल्वेखाली आल्यानं संपूर्ण स्थानकात खळबळ उडाली. घाबरलेल्या अवस्थेत हा तरुण रेल्वे रुळांवर पडला. या प्रवाशाचं नाव भोला सिंह असं आहे. तो दिबियापूरला जाण्यासाठी भरठाणा रेल्वे स्थानकावर आला होता, ट्रेनमध्ये चढत असताना तो पडला. सुदैवानं तो वाचला. ”आज देवाने माझा जीव वाचवला आहे”, असं भोला सिंहनं सांगितलं.

हेही वाचा – VIDEO : मुलीच्या कानात घुसला साप..! भीतीनं उडेल थरकाप; वाचा पुढं काय झालं!

हेही वाचा – डाय करूनही केस पांढरेच राहिल्यामुळं महिलेनं ब्युटी पार्लरवाल्याला झोडलं..! VIDEO व्हायरल

प्रवाशांनी प्रवाशाला बाहेर काढलं

दिल्ली-हावडा रेल्वे ट्रॅकखाली सुपरफास्ट इंटरसिटी एक्सप्रेस मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता आग्राहून प्लेट फॉर्म क्रमांक दोनवर भरठाणा रेल्वे स्थानकावर पोहोचली. दरम्यान, ट्रेनमध्ये प्रवास करत असताना भोला सिंह घाबरून ट्रेनखाली रेल्वे रुळांवर पडला. यादरम्यान ट्रेन आपल्या वेगानं धावली आणि संपूर्ण ट्रेन गेल्यानंतर प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आणि जिवंत होता. ट्रेन निघून गेल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्याला वर ओढलं. याच घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment