ना दोन्ही पाय, ना एक हात, तरीही UPSC परीक्षा पास झालाय सुरज तिवारी!

WhatsApp Group

UPSC Result 2023 : उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे राहणारा दिव्यांग सुरज तिवारी याने यूपीएससी परीक्षेत आपला झेंडा फडकवला आहे. रेल्वे अपघातात सुरजला त्याचे दोन्ही पाय आणि एक हात गमवावा लागला होता. तरीही सुरजने हिंमत हारली नाही आणि यूपीएससी परीक्षेत 917 वा क्रमांक मिळवला. त्यांच्या यशावर समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीट केले की, ‘मैनपुरीच्या दिव्यांग सुरज तिवारीने पहिल्याच प्रयत्नात IAS परीक्षा उत्तीर्ण करून संकल्पाची शक्ती इतर सर्व शक्तींपेक्षा मोठी आहे हे सिद्ध केले. सुरजच्या ‘सूरज’ सारख्या कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.’

सुरजने लोकांसमोर एक आदर्श ठेवला आहे की परिस्थिती कितीही कठीण असो… पण प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सुरजला दोन्ही पाय आणि एक हात नाही आणि दुसऱ्या हातात फक्त तीन बोटे आहेत, पण त्याची मेहनत आणि झोकून आज सूरजने हे स्थान मिळवले आहे.

हेही वाचा – IPL 2023 : चेन्नई-गुजरात मॅचमध्ये घडली ‘अशी’ गोष्ट, आता BCCI लावणार 17,000 झाडे!

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी सुरज 18 ते 20 तास अभ्यास करायचा. सुरजने कोणतेही प्रशिक्षण आणि अतिरिक्त वर्ग न घेता हे यश मिळवले आहे. सुरज मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडील राजेश तिवारी हे टेलर मास्तर असून कुरवली येथे त्यांचे एक छोटेसे टेलरिंगचे दुकान असून त्यातून कुटुंबाचा खर्च चालतो.

2017 मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात सुरजने आपले दोन्ही पाय आणि एक हात गमावला होता. सुरजवर चार महिने उपचार सुरू होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागली आणि काही वेळाने सुरजच्या एका भावाचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंब दु:खी झाले मात्र सूरजने हिंमत न हारता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून हे यश संपादन केले. सुरजच्या घरी अभिनंदन करण्यासाठी लोक येत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment