‘ब्रेस्ट मिल्क’ विकून महिन्याला ८७ हजार रुपये कमाई!  ‘हे’ दूध किती सुरक्षित?

WhatsApp Group

US Women Selling Breast Milk : अमेरिकेत स्तनपानाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेक महिला आपल्या बाळांना फॉर्म्युला दूध न देता नैसर्गिक ब्रेस्ट मिल्क देण्याकडे झुकत आहेत. याच दरम्यान एक चकित करणारी माहिती समोर आली आहे, अनेक अमेरिकन महिला आपल्या शरीरात जास्त प्रमाणात तयार होणारे ब्रेस्ट मिल्क विकून महिन्याला $1000 (सुमारे ₹87,000) पर्यंत कमावत आहेत!

सुरक्षा आणि दर्जाच्या बाबतीत ही प्रथा वादग्रस्त ठरत आहे. महिलांनी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक ग्रुप्सद्वारे दूध विक्रीस सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे, तर काही बॉडीबिल्डर्सही ब्रेस्ट मिल्कचा वापर करत असल्याचं म्हटलं जातं.

ब्रेस्ट मिल्क इतकं खास का?

आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे की ब्रेस्ट मिल्कमध्ये असलेल्या अँटीबॉडीज, प्रोटीन आणि नैसर्गिक फॅट्समुळे ते बाळासाठी सर्वोत्तम पोषण आहे. यामुळे इम्युनिटी वाढते, शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते. युनिसेफ आणि WHO सह सहा महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान करण्याचा सल्ला देतात.

हेही वाचा – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : प्रज्ञा सिंह ठाकूर निर्दोष, कारण ‘ही’ १५ कारणे!

पण ब्रेस्ट मिल्क विकत घेणं धोकादायक का?

US FDA नुसार, बाजारातून किंवा ऑनलाईन अनोळखी महिलांकडून दूध विकत घेणं धोक्याचं ठरू शकतं. HIV, हिपाटायटिस B आणि C सारख्या आजारांचा धोका असतो. दूध योग्य तापमानात न साठवल्यास बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता असते. अनेक महिलांना जास्त दूध मिळवण्यासाठी अनहेल्दी मार्गांचा वापर करावा लागतो, ज्यामुळे दूधाची गुणवत्ता कमी होऊ शकते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment