

Viral Video : सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे फुटेज काही अघटित घडण्यापूर्वीचे आहे. या घटनेमुळे 2000 हून अधिक लोकांचे प्राण गेले. उत्तर आफ्रिकेच्या मोरोक्कोमध्ये शुक्रवारी 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला, मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आणि अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध असलेल्या देशातील माराकेश शहरात हा मोठा भूकंप झाला. काही वेळाने व्हिडिओमध्ये लोक धावताना दिसत आहेत. त्यात भरपूर धूळही दिसत आहे, त्यामुळे इमारत कोसळल्याचे दिसते. सध्या बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. किमान 2012 लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर 2059 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 1404 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गृहमंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा – Asia Cup 2023 : आज भारत-पाकिस्तान सामन्यात 5 मोठे विक्रम होण्याची शक्यता!
दोन क्षेत्रे सर्वाधिक प्रभावित
भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या अल-हॉज प्रांतात 1,293 मृत्यूची नोंद झाली आहे. तरूदंत प्रांतात 452 मृत्यू झाले आहेत. हे दोन सर्वाधिक प्रभावित क्षेत्र आहेत. उत्तर आफ्रिकन प्रदेशात हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. एवढा मोठा भूकंप 120 वर्षांनंतर झाल्याचे एका तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!