

Husband Name Tattoo On Forehead : प्रेमात लोक काय करत नाहीत. विशेषत: प्रेम व्यक्त करताना लोक काहीही करायला तयार असतात. काही महागड्या भेटवस्तू देतात तर काही सरप्राईज पार्ट्यांमधून आपले प्रेम व्यक्त करतात. तुमच्या जोडीदाराचे नाव गोंदवतानाही तुम्ही अनेकांना पाहिले असेल. पण तुम्ही कपाळावर टॅटू काढताना पाहिलं आहे का?
नुकताच एका महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या पतीच्या नावाचा टॅटू कपाळावर गोंदवताना दिसत आहे. हातावर किंवा मानेवर असे करताना आपण लोकांना पाहिले आहे, पण कपाळावर कोणाचे नाव गोंदवून घ्यावेसे वाटेल?महिलेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा – सुधा मूर्ती यांचा कपिल शर्मा शोमध्ये ‘मोठा’ खुलासा, ऐकून प्रेक्षकही थक्क!
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला खुर्चीवर बसली आहे आणि टॅटू आर्टिस्ट तिच्या पतीचे नाव एका कागदावर लिहून तिच्या कपाळावर कोरत आहे. पतीचे नाव सतीश असून ते महिलेच्या संपूर्ण कपाळावर दिसते. त्यानंतर सुईच्या साहाय्याने कपाळावर नावाची शाई भरू लागते. यादरम्यान महिलेलाही वेदना होत होत्या, परंतु पतीला आश्चर्यचकित करण्यासाठी ती वेदना सहन करते.
king_maker_tattoo_studio या आयडीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तो 12 मिलियन अधिक म्हणजे 1.2 कोटी वेळा पाहिला गेला आहे, तर 2 लाख 68 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक केले आहे.