६७ वर्षांनंतर पहिल्यांदा अंघोळ केली आणि ‘त्यांचा’ मृत्यू झाला!

WhatsApp Group

World Dirtiest Man Death : बरेचदा लोक थंडीच्या दिवसात अंघोळ करणे टाळतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांनाही अंघोळ करणे कंटाळवाणे वाटते आणि थंडीच्या दिवसात ही संधी सहज मिळताच ते अंघोळ पुढे ढकलतात. पण काही लोक हिवाळा असो किंवा उन्हाळा, कधीही अंघोळ करत नाहीत. मग अशा लोकांना आपल्या शरीराचीही पर्वा नसते. इराणमधील एक व्यक्ती या कारणामुळे खूप चर्चेत होता कारण त्याने १-२ नव्हे तर संपूर्ण ६७ वर्षे अंघोळ केली नव्हती. पण जेव्हा त्याने पहिल्यांदा अंघोळ करण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिस्थिती त्याच्यासाठी जीवघेणी ठरली.

६७ वर्षांपासून आंघोळ नाही!

माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणचा रहिवासी असलेला अमो हाजी हा संपूर्ण जगात जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून प्रसिद्ध होता. IRNA वृत्तसंस्थेने मंगळवारी सांगितले की त्यांचा मृत्यू झाला. ते ९४ वर्षांचे होते. टाईम्स नाऊसह इतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी ६७ वर्षांपासून आंघोळ केली नव्हती. म्हणजेच अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी स्वतःची स्वच्छता केली नव्हती.

हेही वाचा – Aadhaar Card : रेशन घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी..! सरकारनं सुरू केली ‘नवी’ सुविधा

अंघोळ का नाही केली?

सुमारे ७ दशकांपासून अंघोळ न करण्यामागे त्या व्यक्तीची एक विचित्र भीती होती. त्यांना पाण्याची भीती वाटत होती आणि चुकून कधी अंघोळ केली तर आजारी पडेल असे त्यांना वाटायचे. दक्षिणेकडील फार्स प्रांतातील देगाह गावात रविवारी त्यांचे निधन झाले. अंघोळ हे त्यांच्या मृत्यूचे कारण आहे.काही महिन्यांपूर्वी गावातील लोकांनी त्यांना बाथरूममध्ये नेले आणि एकत्र अंघोळ घातली. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. पहिल्यांदा अंघोळ केल्यावर ते आजारी पडू लागले आणि त्यांचा मृत्यू झाला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment