डबल पगार आणि १० लाख रुपये..! कंपनीचं कर्मचाऱ्यांना खुलं चॅलेंज; कामासोबत करावी लागेल ‘ही’ गोष्ट!

WhatsApp Group

Zerodha Company Challenge To Employees : झिरोधा (Zerodha) कंपनीचे सीईओ नितीन कामथ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नवे आव्हान दिले आहे. हे आव्हान फिटनेससंबंधी आहे. यशस्वी कर्मचाऱ्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे. नितीन कामथ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. एका वृत्तानुसार, त्यांनी सांगितले आहे की या आव्हानात यशस्वी झालेल्यांना बक्षीस म्हणून एक महिन्याचा अतिरिक्त पगार दिला जाईल. पहिल्यांदाच एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असे फिटनेस चॅलेंज आणले आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

काय आहे चॅलेंज?

वास्तविक झिरोधाच्या सीईओंना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा फिटनेस रुळावर आणायचा आहे. कर्मचाऱ्यांना फिटनेसची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी हे चॅलेंज केले आहे. त्यांनी कर्मचार्‍यांना फिटनेस ट्रॅकर्सवर त्यांच्या फिटनेससाठी रोजचे ध्येय निश्चित करण्याचे आव्हान दिले आहे. जो कोणी पुढील वर्षी या चॅलेंजपैकी ९० टक्के पूर्ण करेल त्याला बक्षीस दिले जाईल.

हेही वाचा – नदीत पडला बुलडोझर..! पुल पाडायला गेला आणि झाला भयानक अपघात; VIDEO व्हायरल!

१० लाख रुपयांचा लकी ड्रॉ

हे आव्हान यशस्वी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून एका महिन्याचा पगार दिला जाईल. यासोबतच यामध्ये १० लाख रुपयांचा लकी ड्रॉही ठेवण्यात आला आहे. लोकांमध्ये धुम्रपानाची सवय सातत्याने वाढत असल्याचे कामथ यांनी ट्वीट केले आहे. हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. ही एक महामारी बनत आहे.

सीईओंनी स्वतःचा अनुभवही सांगितला आहे. त्यांनी आपले फिटनेसचे लक्ष्य बनवले आहे आणि आपला फिटनेस कसा वाढवला हे सांगितले आहे. केवळ फिटनेसवर लक्ष केंद्रित करून त्यांनी वजन कमी केले. कोरोनाच्या काळात त्यांचे वजन वाढले होते. आरोग्यदायी आहाराबाबतही त्यांनी कर्मचाऱ्यांना जागरुक केले आहे. झिरोधा ही एक भारतीय वित्तीय सेवा कंपनी आहे, जी शेअर बाजारातील शेअर्सच्या व्यापारासाठी आणि म्युच्युअल फंडांमधील व्यवहारांसाठी एक व्यासपीठ प्रदान करते.

Leave a comment