Maggots Removed From Eyes And Nose : भारतासह जगभरात विचित्र आजार आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांशी संबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत. आता असंच एक विचित्र प्रकरण बंगळुरूमधून समोर आलं आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान एका व्यक्तीच्या डोळ्यातून आणि नाकातून एक-दोन नव्हे तर १४५ अळ्या काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हे तुम्हाला किळसवाणं वाटेल पण हे खरे आहे आणि याचे मुख्य कारण एक आजार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बंगळुरूच्या राजराजेश्वरी नगर येथील स्पर्श हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान ६५ वर्षीय महिलेच्या डोळ्यातील आणि नाकातून अळ्या काढल्या. एका वर्षापूर्वी म्यूकोर्मायकोसिस (काळी बुरशी) आणि कोविड-१९ जेखील त्यांना झाला होता. या अळ्यांमुळे त्यांच्या नाकात कीड झाली होती, त्यामुळे डॉक्टरांना त्याच्या नाकातील मृत ऊतक काढावे लागले.
रुग्णाला तीन दिवसांपासून नाकातून रक्त येत होतं आणि डाव्या डोळ्यात सूज येत होती. तपासणीअंती त्याच्या नाकात व डोळ्यात जंत आढळून आले. त्यामुळे त्यांचा एक डोळा पूर्णपणे मेला होता आणि त्यामुळे त्यांना वेदना होत होत्या. मात्र, सर्व अळ्या काढण्यात आल्या असून रुग्णाची प्रकृती आता चांगली आहे. तीन महिन्यांपूर्वी रुग्णावर इतरत्र उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली. यापूर्वीही अशाच लक्षणांमुळं एका डोळ्यात सूज आली होती. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला खूप त्रास झाला होता.
हेही वाचा – Raju Srivastava Death : राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयातून बाहेर आणतानाचा PHOTO व्हायरल!
Bengaluru: 145 maggots found in woman's eye, nose https://t.co/NVJuiX4RCK
— TOI Cities (@TOICitiesNews) September 18, 2022
कशामुळं होतो हा प्रकार?
डॉक्टरांचा असा विश्वास आहे, की नाकपुड्यांमध्ये ओलावा आहे आणि जर एखाद्या व्यक्तीनं नाकाच्या स्वच्छतेकडं लक्ष दिलं नाही, तर गंधाने आकर्षित झालेल्या माश्या नाकाच्या आत अंडी घालू शकतात, ज्याचं नंतर अळ्यांमध्ये रूपांतर होते. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की जर अळ्या काढले नाहीत तर ते मेंदूपर्यंत पोहोचू शकतात आणि मेंदूच्या ऊतींचे नुकसान करू शकतात. डोळा थेट मेंदूशी जोडलेला असतो आणि जर डोळा गुंतलेला असेल तर संसर्ग होऊ शकतो.
भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये ही समस्या सामान्य असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. उष्ण आणि दमट हवामान हे यामागील प्रमुख कारण आहे आणि ही समस्या वृद्ध लोकांमध्ये जास्त दिसून येते, विशेषत: महिलांमध्ये.जे नाक स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत त्यांना याचा त्रास होतो.