

Bank Holidays November 2022 : ऑक्टोबरमध्ये अनेक सण होते. दुर्गापूजा, दसरा, दिवाळी छठपूजा यांसारख्या मोठ्या सणांमुळे ऑक्टोबर महिन्यात बँकांमध्ये केवळ ९ दिवस कामकाज झाले. म्हणजेच २१ दिवस बँकांना सुट्टी होती. जर तुम्ही तुमचे बँकेशी संबंधित काम पूर्ण करू शकत नसाल तर ते लवकर निकाली काढा. कारण नोव्हेंबरमध्ये बँका १० दिवस बंद राहणार आहेत. जे डिजिटल व्यवहार करत नाहीत, त्यांनी बँकेशी संबंधित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.
बँकांमध्ये कोणत्या दिवशी सुट्टी असेल याची माहिती रिझर्व्ह बँक देते. रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षासाठी सुट्टीची यादी तयार करते. येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की नोव्हेंबरमध्ये देशभरातील बँका १० दिवस बंद राहणार नाहीत. आरबीआयने सुट्ट्यांची जी यादी जाहीर केली आहे, त्यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. त्याच वेळी, काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त त्याच्याशी जोडलेल्या राज्यांमध्येच बंद राहतील.
हेही वाचा – अरे काय चाललंय..! वंदे भारत ट्रेनचं पुन्हा नाक तुटलं; अपघाताची हॅट्ट्रिक
- १ नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव आणि कुट मुळे बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँक सुट्टी असेल.
- ६ नोव्हेंबर – रविवारमुळे बँका बंद राहतील.
- ८ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, रहस पौर्णिमा आणि वांगला उत्सव साजरा केला जाईल, त्यामुळे बँका बंद राहतील.
- ११ नोव्हेंबर – बंगळुरू आणि शिलाँगमध्ये वांगला उत्सव आणि कनकदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
- १२ नोव्हेंबर – महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँका बंद राहतील.
- १३ नोव्हेंबर – रविवार असल्यामुळे सुट्टी आहे.
- २० नोव्हेंबर – रविवार साप्ताहिक सुट्टी आहे.
- २३ नोव्हेंबर – सेंग कुत्स्नेममुळे शिलाँगमध्ये बँकेला सुट्टी असेल.
- २६ नोव्हेंबर – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
- २७ नोव्हेंबर – रविवार आहे आणि त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.