

Water Before Tea For Acidity : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये बरेच लोक दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात. मात्र, काही लोकांना चहा प्याल्यानंतर लगेचच ऍसिडिटी, जळजळ किंवा अपचनाचा त्रास होतो. अशा लोकांसाठी एक सोपी सवय – चहा प्यायच्या आधी एक ग्लास साधं पाणी पिणं – फायदेशीर ठरू शकतं का? याच प्रश्नाचं उत्तर दिलंय काही आरोग्य आणि आयुर्वेद तज्ज्ञांनी.
चहा मधील कॅफीन आणि टॅनिनसारखे घटक शरीरातील आम्ल वाढवतात, त्यामुळे पचनसंस्था आणि मेटाबोलिझमवर विपरीत परिणाम होतो. पण जर तुम्ही चहा प्यायच्या आधी एक ग्लास पाणी प्यायलात, तर पोटातील ऍसिड डायल्यूट होऊन त्याचा परिणाम कमी होतो, असं मत RMCH हॉस्पिटलचे मेडिसिन तज्ज्ञ डॉ. सुभाष गिरी यांनी व्यक्त केलं.
काय सांगतात तज्ज्ञ?
“सकाळी उठल्यावर कोरड्या पोटी चहा न घेता आधी पाणी पिलं, तर शरीरातील आम्लाचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि चहा मधील कॅफीनचा दाहक परिणामही कमी होतो,” असं डॉक्टर गिरी सांगतात.
हेही वाचा – टीम इंडियाच्या जर्सीवर ‘या’ कंपनीचे नाव, BCCI कडून 2027 पर्यंतची प्रायोजकत्व डील जाहीर!
“मात्र, हे लक्षात घ्या की पाणी पिण्याने ऍसिडिटी पूर्णपणे जात नाही. पण हो, तिचं प्रमाण आणि त्रास निश्चितच कमी होतो.”
चहा प्यायच्या आधी काय करावं?
- चहा आधी कोमट पाणी प्या – यामुळे शरीराचा pH स्तर संतुलित राहतो.
- हलकं फळ, नाश्ता करा – रिकाम्या पोटी चहा घेण्याऐवजी आधी थोडंसं खाणं फायदेशीर.
- हर्बल किंवा ग्रीन टी निवडा – नियमित दूध चहा ऐवजी हर्बल, ग्रीन किंवा ब्लॅक टी ऍसिडिटीसाठी चांगला पर्याय.
- चहा उकळताना दूध वेगळं ठेवा – दूध आणि चहा एकत्र उकळण्याऐवजी ब्लॅक टी करून वरून दूध मिसळा.
फक्त पाणी पुरेसं नाही
जर तुम्ही दिवसभर तेलकट, मसालेदार किंवा जंक फूड खात असाल, तर फक्त पाणी पिऊन ऍसिडिटीवर नियंत्रण मिळवणं कठीण आहे. म्हणून:
- आहार नियंत्रित ठेवा
- कॅफीनचं प्रमाण कमी करा
- व्यायाम आणि वेळेवर झोप ही सवय लावा
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा