

Eating for Longevity : आपलं आयुष्य दीर्घायुष्य असावं असं प्रत्येकाला वाटतं. जागतिक आयुर्मानानुसार, भारतातील पुरुषांचं सरासरी वय ६९.५ वर्षे आणि महिलांचे ७२.२ वर्षे आहे. हृदयाशी संबंधित आजार, फुफ्फुसाचे आजार, पक्षाघात, मधुमेह असे सुमारे ५० आजार आहेत, जे कमी वयात मृत्यूचं कारण ठरू शकतात. विज्ञान मानतं, की जर कोणी चांगल्या गोष्टींचं सेवन केलं तर त्याचं आयुष्य वाढू शकतं आणि जर कोणी अस्वास्थ्यकर पदार्थांचे सेवन केले तर त्याचं आयुष्य देखील कमी होऊ शकतं.
‘या’ गोष्टी खाल्ल्यानं वय कमी होतं..
द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, मिशिगन विद्यापीठातील तज्ञांनी काही खाद्यपदार्थ आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी संशोधन केलं. संशोधकांना असं आढळून आलं आहे की अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमचे आयुष्य काही मिनिटांनी वाढवतात, तर काही गोष्टींचं सेवन केल्यानं तुमचे आयुष्य काही मिनिटांनी कमी होते. उदाहरणार्थ, जर एखाद्यानं नट्स खाल्ले तर त्याचं आयुष्य २६ मिनिटांनी वाढू शकतं, परंतु जर कोणी एकदा हॉट-डॉग खाल्ला तर त्याचं आयुष्य ३६ मिनिटांनी कमी होते. याशिवाय पीनट बटर आणि जॅम सँडविचमुळं कोणाचेही वय अर्ध्या तासानं वाढू शकतं.
नेचर फूड या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार हा अभ्यास व्यक्तीच्या चांगल्या जीवनमानावर आधारित होता. अभ्यासात, शास्त्रज्ञांनी सुमारे सहा हजार वेगवेगळ्या गोष्टी (नाश्ता, दुपारचं जेवण आणि पेय) तपासल्या. त्यांना आढळून आलं की जर एखादी व्यक्ती प्रक्रिया केलेले मांस खात असेल तर तो त्याच्या आयुष्यात दररोज ४८ अतिरिक्त मिनिटं जोडू शकतो.
हेही वाचा – ७० वर्षाची आजी पहिल्यांदा बनली ‘आई’..! लग्नाच्या ५४ वर्षानंतर दिला मुलाला जन्म
द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, ‘असे’ पदार्थ जे आयुष्य कमी करू शकतात…
- हॉट डॉग : आयुष्य ३६ मिनिटांनी कमी करते
- प्रक्रिया केलेले मांस (बेकन) : २६ मिनिटे आयुष्य कमी करतं
- चीज बर्गर : आयुष्य ८.८ मिनिटांनी कमी करतं
- सॉफ्ट ड्रिंक्स : १२.४ मिनिटांनी आयुष्य कमी करतं
- पिझ्झा : आयुष्य ७.८ मिनिटांनी कमी करतं
या गोष्टी खाल्ल्याने वय वाढतं…
- पीनट बटर आणि जॅम सँडविच : आयुर्मान ३३.१ मिनिटांनी वाढवतं
- भाजलेले सॅल्मन फिश : वृद्धत्वाची १३.५ मिनिटं वाढवतं
- केळी : आयुष्य १३.५ मिनिटांनी वाढतं
- टोमॅटो : आयुष्य ३.८ मिनिटांनी वाढतं
- एवोकॅडो : आयुष्य १.५ मिनिटांनी वाढतं
हेही वाचा – सावधान..! हे १० पदार्थ रोज खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढेलच आणि हार्ट अटॅकही येईल; वेळ काढून वाचा!
मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर अन्नाचा काय परिणाम होतो हे पाहणे हा या अभ्यासाचा उद्देश होता. तज्ञांनी सांगितलं, की सॅल्मन फिशमध्ये भरपूर पोषण आढळतं. संशोधन टीममध्ये सहभागी असलेले प्रोफेसर ऑलिव्हियर जोलिएट म्हणाले, “संशोधनातून समोर आलेले परिणाम लोकांचे आरोग्य आणि पर्यावरण सुधारण्यास मदत करतील. मानवी आरोग्य आणि पर्यावरण सुधारण्यासाठी लोकांनी आपल्या आहारातही बदल केला पाहिजे.”