सगळं गोरं पण मान तेवढी काळी? ‘हे’ उपाय केले तर नक्कीच होईल फायदा!

WhatsApp Group

मुंबई : सुंदर आणि नेहमी ताजंतवानं दिसण्यासाठी आपण रोज वेगवेगळे प्रकार करतो. नाना प्रकारच्या क्रीम, फेशियल, स्क्रब यांसारख्या गोष्टींमुळं चेहऱ्यावर निखार येतो. कधीकधी चेहरा सुंदर करण्याच्या नादात आपण आपल्या शरीराच्या इतर गोष्टींकडं दुर्लक्ष करतो. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे आपली मान. मानेच्या काळेपणाकडंही लोक समस्या म्हणून पाहतात. चेहरा गोरा असला तरी काही लोकांची मान काळी असते आणि ती गोरी करण्यासाठी लोकांचा विविध प्रकार करण्याकडं कल असतो. पण असे काही घरगुती उपाय आहेत, त्यामुळं हा काळेपणा नक्कीच दूर करता येऊ शकतो.

२-४ चमचे बेकिंग सोडा…

बेकिंग सोडासुद्धा त्वचेचा काळेपणा दूर करू शकतो. त्वचेत मृत पेशी असतात, त्या दूर करण्याचं काम बेकिंग सोडा करू शकतो. साधारण २-४ चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळायचा आणि हे मिश्रण मानेवर लावायचं. हा लेप सुकल्यानंतर पाण्यानं धुवून मॉइश्चरायझ करायचं. याशिवाय बटाट्याचा रस मानेवर लावून तो थोडा वेळ ठेवायचा आणि कोमट पाण्यानं धुवून टाकायचं. ही गोष्ट तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकतात.

गुलाबपाणी, बेसन, हळद आणि लिंबाचा रसही त्वचेचा काळेपणा दूर करू शकतो. या सर्व गोष्टी दोन-दोन चमचे अशा मात्रात घ्यायच्या आणि एकत्र करून त्वचेवर लावायची. जवळपास अर्ध्या तासानंतर हा लेप सुकला की धुवून टाकायचा. याचा परिणाम म्हणून त्वचा गोरी होते. याशिवाय चेहऱ्याला जो ब्लॅक मास्क लावला जातो, तोच तुम्ही मानेवर लावू शकता. आठवड्यातून दोन-तीन मास्कप्रक्रिया फायदेशीर ठरू शकते.

व्हिनेगर आणि कोरफड गुणकारी…

आपल्या त्वचेचा रंग बहुधा मेलॅनिन आणि पीएच पातळीवर अवलंबूत असतो. मानेचा काळेपणा दूर करण्याचा एक उपाय म्हणजे अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करणं. दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये थोडं पाणी मिसळायचं. कापसाचा वापर करून हे मिश्रण मानेच्या काळ्या भागावर लावायचं आणि १० मिनिटांनंतर धुवून टाकायचं. कोरफडचा उपायगोही त्वचा गोरी आणि शुद्ध करण्यासाठी होतो. कोरफडचे औषधी फायदे ओळखून त्याचा वापर सौंदर्यप्रसाधनात केला जातो. भरपूर प्रमाणात पाण्याची क्षमता असलेली कोरफड तुमच्या त्वचेला तजेलदार करते. शिवाय मानेवर घामामुळे येणारा चिकटपणाही दूर करते.

स्नान करण्यापूर्वी लिंबू तुम्ही मानेवर घासू शकता. थोडीशी साखर आणि लिंबूचा अर्क मानेची त्वचा गोरी करू शकते. लिबांत सायट्रिक अॅसिड असल्यामुळं त्वचेतील मेलॅनिन कमी करतं. दोन आठवड्यांसाठी हा उपाय केला, तर तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.

Leave a comment