सुखी आणि एकत्र कुटुंब हवं असेल तर या ५ गोष्टी नक्की करून बघा!

WhatsApp Group

मुंबई : कुटुंब सुखी असणं, हे आजच्या धावपळीच्या जगात किती कठीण आहे हे आपण सगळेजण जाणतो. वेळ मिळत नसल्यामुळ आपण आपल्या कुटुंबासोबत एकत्र कधीतरीच असतो. शिवाय, भांडणही होत असतात. कुटुंबात चांगलं वातावरण असावं, अशी आपली सर्वांची इच्छा असते. मात्र आपल्याला काय हवंय आणि आहे यामधील अंतर भरणं फार कठीण आहे. एकमेकांना समजून न घेतल्यानं चांगलं नातं बिघडू शकतं. त्यामुळं कुटुंबात तेढही निर्माण होऊ शकते. ही दरी भरून काढण्याची अनेकांना इच्छा असते, पण ती पूर्ण करण्यात फार कमी लोक यशस्वी होतात.
कुटुंबातील ही समस्या वेळीच आणि काही प्रयत्नांनंतर अधिक चांगल्या प्रकारे सोडवता येते. यासह खालील पाच गोष्टी केल्या, तर आपलं कुटुंब एकत्र आणि खुश राहू शकतं. अगदी हम साथ साथ है मधील सिनेमासारखं.

कुटुंबासह गोष्टी शेअर करा –

मतभेद संपवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करणं. तुमचा दिवस कसा होता, तुम्ही दिवसभर काय केलं, या गोष्टी तुम्ही कुटुंबासोबत शेअर कराल, तर कुटुंबातील संबंध घट्ट होतील आणि समस्या आपोआप कमी होऊ लागतील.

रात्रीचं जेवण एकत्र करा –

दिवसभराच्या व्यस्त दिनचर्येमध्ये तुम्ही कुटुंबासोबत एकत्र जेवण केल, तर एकमेकांशी असेलले मतभेद संपुष्टात येऊ लागतात. या दिनचर्याद्वारे तुम्हाला कुटुंबाची दैनंदिन दिनचर्या कळू शकते. यासोबतच कुटुंबाला वेळ देता येत नसल्याची खंतही कमी होईल.

कुटुंबासह उपक्रमात सहभागी व्हा –

कोणत्याही कुटुंबात अंतर तेव्हाच येते जेव्हा तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. अशा स्थितीत समाजातील वादविवाद, गमतीशीर उपक्रम किंवा कार्यक्रमांमध्ये कुटुंबासोबत सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तुमच्या सर्वांचं बॉन्डिंग चांगलं होईल आणि ते त्यांच्या मनातील गोष्ट तुमच्याशी शेअर करायला अजिबात मागेपुढं पाहणार नाहीत.

प्रत्येक सण-उत्सव एकत्र साजरा करा –

एकत्र राहण्याचा आणि अंतर कमी करण्याचा मार्ग म्हणजे प्रत्येक सण कुटुंबासह साजरा करणं. यामुळं मुलांना सर्व प्रकारच्या चालीरीतीही कळतील आणि एकत्र राहण्याचं महत्त्व समजेल.

आपले निर्णय कुटुंबावर लादू नका –

कुटुंबातील प्रत्येकानं आनंदी राहण्यासाठी आणि सर्व शेअर करण्यासाठी, यासाठी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे एकमेकांच्या निर्णयांचा आदर करणे आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर आपलं मत किंवा निर्णय लादू नका. वरील गोष्टी जर कोणत्याही कुटुंबात घडल्या तर ते तुटण्याची शक्यता फारच कमी असते.

Leave a comment