अक्षय्य तृतीयापर्यंत सोने बनवणार रेकॉर्ड! 10 ग्रॅमची किंमत राहणार ‘इतकी’

WhatsApp Group

Gold Price : अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशी या दोन्ही मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीसाठी बाजारात खूप गर्दी असते. यावेळीही अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीला सोन्याच्या दागिन्यांची मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे. केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणतात की, 2024 मध्ये जगाची आर्थिक स्थिती, भू-राजकीय तणाव आणि सांस्कृतिक मागणीमुळे सोन्याच्या आणि दागिन्यांच्या किमतीत मोठी झेप होऊ शकते. तरीही सोन्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. बाजारात सुधारणा झाल्यास सोन्याची मागणी वाढेल आणि वर्षअखेरीस मोठी उसळी दिसू शकते.

अक्षय्य तृतीयेपर्यंत सोने…

केडियाच्या म्हणण्यानुसार, अक्षय्य तृतीयेपर्यंत, स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत 68,500 रुपये प्रति 10 ग्रॅम राहण्याचा अंदाज आहे. यावर्षी अक्षय्य तृतीया हा सण 10 मे 2024 रोजी येत आहे. या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. सोन्याच्या सध्याच्या किमतीवर नजर टाकली तर, गुरुवार, 28 मार्च 2024 रोजी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 69,040 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. या संदर्भात अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याच्या दरात सुमारे 500 रुपयांची घसरण दिसून येत आहे.

हेही वाचा – Lokasabha Elections 2024 : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर!

धनत्रयोदशीपर्यंतचा अंदाज काय?

अजय केडिया सांगतात की, अलीकडच्या काळात सोन्याच्या किमतीत काहीशी घसरण झाली असली, तरी दीर्घकाळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. यावर्षी धनत्रयोदशीचा सण 29 ऑक्टोबरला पडणार असून तोपर्यंत सोन्याचा दर 72 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे जाऊ शकतो. याचे प्रमुख कारण म्हणजे किरकोळ खरेदीवर दिलेला भर तसेच रिझव्र्ह बँकेने सोने खरेदीवर दिलेला भर.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment