

Gold Silver Price : लग्नाच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरात आज ४०० रुपयांची उसळी पाहायला मिळत आहे. स्थानिक बाजारात, एमसीएक्सवर सोने ३९३ रुपयांच्या वाढीसह ५३३२४ रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहे. चांदीच्या दरात १२०० रुपयांची वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सध्या चांदी ११५० रुपयांच्या वाढीसह ६३३९० रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे. सोने सध्या ३.५ महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर आहे आणि चांदी ७ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर आहे.
नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीची कामगिरी उत्कृष्ट होती. मासिक आधारावर सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम २५०० रुपये आणि चांदीच्या दरात ३८०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, आगामी बैठकीत व्याजदरात नरम वाढ केली जाईल, ज्यामुळे डॉलर निर्देशांक १०६ वर आला आहे. डॉलर निर्देशांक कमी झाल्यामुळे सोन्याला बळ मिळाले आहे.
हेही वाचा – BSNL Recharge Plan : बीएसएनएलचा परवडणारा रिचार्ज..! फक्त ९४ रुपयात; वाचा प्लॅनविषयी
कच्च्या तेलात ३ टक्क्यांनी वाढ
येथे कच्च्या तेलात सुमारे ३ टक्क्यांनी वाढ होत असून ते प्रति बॅरल ८५.५ डॉलरच्या पातळीवर आहे. अमेरिकेतील कच्च्या तेलाचा साठा कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याची बातमी आली. याशिवाय ओपेकच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनातही घट झाली आहे, ज्यामुळे किंमतीला आधार मिळाला आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, नोव्हेंबर महिन्यात ओपेक देशांनी दररोज २९.०१ मिलियन बॅरल तेलाचे उत्पादन केले. ऑक्टोबरच्या तुलनेत हे ७.१ लाख बॅरल प्रतिदिन कमी आहे. सप्टेंबरमधील सरासरी उत्पादन २०२० नंतर सर्वाधिक होते.