Gold Silver Price Today : सोने ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त..! चांदीही उतरली; वाचा आजचे दर!

WhatsApp Group

Gold Silver Price Today : आज, 10 मे 2023 रोजी, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. मात्र, सोन्याचा भाव 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही प्रतिकिलो 76 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 61430 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 76,351 रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव मंगळवारी संध्याकाळी 61533 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज (10 मे) सकाळी 61430 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी स्वस्त झाले आहेत.

हेही वाचा – IPL 2023 : मुंबईच्या खेळाडूकडून मैदानातील गाडीचं नुकसान..! आता TATA देणार 5 लाख; पाहा Video

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 61,185 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे (22 कॅरेट) सोने आज 56269 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्ध (18 कॅरेट) सोन्याचा भाव 46,072 रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, 585 (14 कॅरेट) शुद्धतेचे सोने आज 35,936 रुपयांवर स्वस्त झाले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 76351 रुपये झाला आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBJA द्वारे जारी केलेले दर देशभरात सामान्य आहेत परंतु GST त्यांच्या किमतींमध्ये समाविष्ट नाही. दागिने खरेदी करताना, करांच्या समावेशामुळे सोने किंवा चांदीचे दर जास्त आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment