Gold Silver Price Today : सोन्याने सर्व विक्रम मोडले आहेत. दिल्ली सराफा बाजारात सोने (Gold Silver Price Today ) १२१ रुपयांच्या उसळीसह ५६२३६ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला. चांदीचा भाव १४५ रुपयांनी घसरून ६८७२३ रुपये प्रति किलोवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १९२१ डॉलरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात एमसीएक्सवर तो ५६३४१ रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो ५६३७० रुपयांवर पोहोचला होता. हे नवीन सर्वकालीन उच्च आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,०१० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,७४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,०१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,७४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,०१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,७४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,०४० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,७७० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७२७.५० रुपये आहे.
सोन्याने $१९०० ची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडली
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्च उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, सलग चौथ्या आठवड्यात सोन्याचा भाव वाढला आहे. डॉलर इंडेक्स आणि उत्पन्नातील कमजोरीमुळे सोन्यात मजबूती आहे. डॉलर निर्देशांक १०२ च्या खाली आहे. महागाईत दिलासा मिळाल्याने फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी वाढवेल अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने १९०० डॉलरची मानसशास्त्रीय पातळी ओलांडली आहे.
हेही वाचा – ऐकलं का..! Honda ने बंद केली ‘ही’ लोकप्रिय कार; जाणून घ्या कारण!
२४ कॅरेट सोन्याचा दर किती आहे?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ५६४६ रुपये होता. तसेच २२ कॅरेटचा भाव ५५११ रुपये, २० कॅरेटचा भाव ५०२५ रुपये, १८ कॅरेटचा भाव ४५७३ रुपये, १४ कॅरेटचा दर ३६४२ रुपये प्रति ग्रॅम होता. ९९९ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ५६४६२ रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदीचा भाव ६८११५ रुपये प्रति किलो होता.
सोने ५७ हजारांपर्यंत वाढेल
आयआयएफएल सिक्युरिटीजचे कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी सांगितले की, देशांतर्गत बाजारात MCX वर सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे (गोल्ड रेट MCX). चांदी ९ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने १९०० डॉलरची मानसशास्त्रीय पातळी ओलांडली आहे. अमेरिकेतील महागाई कमी झाल्याने सोन्याच्या किमतीला आधार मिळेल. सोन्या-चांदीत तांत्रिक आधारावर वाढ अपेक्षित आहे. सोने आता ५६६०० रुपये आणि नंतर ५७००० च्या दिशेने जाईल. ५५७०० आणि नंतर ५५२०० रुपयांवर सोन्याला मजबूत सपोर्ट आहे.