

Gold Silver Price Today : आज २० मार्च २०२३ रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ५९ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत ६८ हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ५९६७१ रुपये आहे. तर ९९९ शुद्धतेची चांदी ६८२५० रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, २४ कॅरेट शुद्ध सोने शुक्रवारी संध्याकाळी ५८२२० रुपये प्रति १० ग्रॅम होते, जे आज सकाळी ५९६७१ रुपयांवर आले आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने-चांदी महाग झाली आहे.
हेही वाचा – घराच्या छतावरची पाण्याची टाकी गोल का असते? चौकोनी का नसते? जाणून घ्या कारण!
आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, ९९५ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी ५९४३२ रुपये झाली आहे. त्याचवेळी ९१६ शुद्धतेचे सोने आज ५४६४५ रुपये झाले आहे. याशिवाय ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४४७५३ पर्यंत खाली आला आहे. त्याच वेळी, ५८५ शुद्धता असलेले सोने आज महाग झाले असून ते ३४९०८ रुपयांवर आले आहे. याशिवाय ९९९ शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज ६८२५० रुपये झाला आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!