Gold Silver Price : खुशखबर! सोन्याचांदीच्या किमतीत घसरण…. जाणून घ्या आजचे नवे दर 

WhatsApp Group

Gold-Silver Price Today : बाजारातील दरांवर नजर टाकली तर मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ३० रुपयांनी वाढून ५२,७३१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ५२,७०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. सोन्याप्रमाणेच चांदीचा भावही ८५६ रुपयांनी वाढून ६१,५१८ रुपये प्रति किलोवर बंद झाला.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,३५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,७५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,७५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,९२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,३५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,७५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,३५० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,७५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०६ रुपये आहे.

हेही वाचा –  Viral Video : जेलमध्ये हॉटेलचं चमचमीत जेवण..! मंत्री सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

Leave a comment